Sanjay Shirsat : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक वेळेत पूर्ण करावे; सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल, दादर येथील स्मारकाचे काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करावे. कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वेळेचे नियोजन याला सर्वोच्च प्राधान्य देऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामाचा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आढावा घेतला. स्मारकाच्या विविध भागांमध्ये सुरू असलेली कामे, आवश्यक साहित्याची उपलब्धता, वाढीव कामे तसेच प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांबाबत शासकीय निवासस्थानी आढावा घेतला.


मंत्री शिरसाट म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची ४५० फूट ( पदपीठ १०० फूट व पुतळ्याची उंची ३५० फूट असणार आहे. हे स्मारक देशासह जगभरातील नागरिकांसाठी प्रेरणास्थळ ठरणार असल्याने त्याची उभारणी जागतिक दर्जाची असावी, यासाठी विशेष दक्षता घ्यावी. स्मारकाच्या इमारतीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. कामाच्या विविध टप्प्यांमध्ये प्रभावी समन्वय राखण्यासाठी सक्षम व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत ठेवावी असेही त्यांनी सांगितले.



वाढीव काम व साहित्य उपलब्धतेबाबत तातडीने कार्यवाही


प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि यंत्रसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावी. कामाची गती कायम ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार २४ तास कामकाजाचे नियोजन करून विविध एजन्सींमध्ये समन्वय साधावा, तसेच वाढलेल्या कामाचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे एमएमआरडीए प्राधिकरण यांना निर्देश देण्यात आले.


स्मारक परिसर संपूर्ण हरित परिसर म्हणून विकसित करण्यात येणार असून, येथे सुमारे १ हजार व्यक्तींची आसनक्षमता असलेले सभागृह, संशोधन केंद्र, ध्यानधारणा केंद्र, ग्रंथालय आणि भूमिगत वाहनतळ यांसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. तसेच स्मारकाचे तीव्र वादळांसह नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहितीही यावेळी देण्यात आली.


या स्मारकाच्या कामासाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत असून, उर्वरित कामे गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री शिरसाट यांनी दिले.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, सहसचिव बागुल, दूरदृश्य प्रणालीद्वारे अनिल सुतार तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने