CM Devendra Fadnavis : मलईदार खात्यांवर वर्षानुवर्षे कब्जा करणारे ३१४ अधिकारी रडारवर

- मुख्यमंत्री कार्यालयाकडून यादी तयार; राजकीय वरदहस्त असलेल्या अधिकाऱ्यांवर करडी नजर


मुंबई : मंत्रालय आणि राज्य सरकारच्या विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर आणि मलाईदार खात्यांवर कब्जा करून बसलेले अधिकारी आता रडारवर आले आहेत. अशा तब्बल ३१४ अधिकाऱ्यांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाने तयार केली असून, गेल्या काही दिवसांपासून या अधिकाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यांच्या दैनंदिन कार्यपद्धतीचा आढावा घेतल्यानंतर आता या अधिकाऱ्यांना तात्काळ इतर विभागात हलवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.



काही अधिकारी तब्बल १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून एकाच विभागात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक महत्त्वाच्या खात्यांमध्ये, विशेषतः महसूल आणि नगरविकास विभाग असो वा अन्य महत्त्वाची खाती, काही विशिष्ट अधिकारी वर्षानुवर्षे एकाच जागी पाय रोवून बसले आहेत. राजकीय नेत्यांशी असलेल्या साटेलोट्यामुळे आणि वरदहस्तामुळे हे अधिकारी एकाच मलाईदार पोस्टवर वर्षानुवर्षे टिकून असतात. अशा अधिकाऱ्यांना शोधून त्यांना धक्का देण्याचे काम आता मुख्यमंत्री कार्यालयाने हाती घेतले आहे.


यापूर्वी मंत्री आस्थापनेवर अनेक वर्षांपासून रुजू असलेल्या अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करत नवीन अधिकाऱ्यांना संधी देण्यात आली होती. तसेच, मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीशिवाय मंत्र्यांच्या आस्थापनेवर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यास मज्जाव करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांची कसून छाननी करण्यात आली आहे.


विशेष म्हणजे, काही अधिकारी मधल्या काळात काही काळासाठी इतरत्र जाऊन पुन्हा आपल्या जुन्याच मलाईदार खात्यावर आपले स्थान पक्के करतात, अशा चलाख अधिकाऱ्यांवरही आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. सध्या ३१४ अधिकाऱ्यांची नावे समोर आली असली, तरी या मोहिमेत आणखीही काही अधिकारी रडारवर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईमुळे मंत्रालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी काळात होणाऱ्या बदल्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Comments
Add Comment

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या

BMC Road Work : आता वारंवार चर खणल्याने रस्त्यांचे होणारे नुकसान होणार कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर विविध उपयोगिता जाळे अर्थात