Amul Lactose Free Milk Packaging : दूधाच्या पॅकेटवरून गोंधळ; व्हायरल व्हिडीओनंतर अमूलने दिली स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : इंस्टाग्रामवर अमूल लॅक्टोज-फ्री दुधाच्या पॅकेटचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. त्रिशांग शेट्टी या क्रिएटरने दुधाचं पॅकेट नेहमीपेक्षा थोडं फुगलेलं दिसत असल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. पॅकेटवरच ‘फुगलेलं पॅकेट खरेदी करू नका’ असा उल्लेख असल्याने त्यांनी याबाबत शंका उपस्थित केली होती. (Amul Lactose Free Milk Packaging)


व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमूलने स्वतः त्रिशांग यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. कंपनीने स्पष्ट केलं की, अमूल सध्या जुन्या टेट्रा पॅकेजिंग तंत्रज्ञानातून नवीन SIG Packaging Technology कडे संक्रमण करत आहे. त्यामुळे या बदलाच्या काळात जुन्या आणि नव्या प्रकारची दोन्ही पॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. अमूलच्या म्हणण्यानुसार, नव्या SIG पॅकेटची रचना अशी आहे की ते पूर्ण भरलेलं आणि किंचित फुगलेलं दिसू शकतं. त्यामुळे पॅकेट खराब असल्याचा गैरसमज होऊ शकतो. (Amul Lactose Free Milk Packaging)



दरम्यान, पॅकेटच्या निळ्या रंगात फरक का दिसतो, याचंही कंपनीने स्पष्टीकरण दिलं. नव्या पॅकेजिंग मटेरियलला मॅट फिनिश असल्यामुळे निळ्या रंगाची छटा काहीशी वेगळी दिसते; मात्र रंगाचा शेड बदललेला नसल्याचं अमूलने स्पष्ट केलं. (Amul Lactose Free Milk Packaging)



तसंच, Blinkit आणि Swiggy Instamart सारख्या प्लॅटफॉर्मवर उत्पादने थेट अमूलकडून पाठवली जात असल्याने मध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होण्याची शक्यता नसल्याचंही कंपनीने सांगितलं. अमूलच्या स्पष्टीकरणानंतर त्रिशांग शेट्टी यांनीही आपली गैरसमजूत झाल्याचं मान्य करत सोशल मीडियावर माफी मागितली आहे. (Amul Lactose Free Milk Packaging)




Comments
Add Comment

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य