BJP Vs Congress : राहुल गांधींच्या पत्रावर भाजपचा पलटवार

- आदिवासी शाळांमधील गैरकारभारासाठी काँग्रेस नेतेच जबाबदार; राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या मुद्यावर राजकारण थांबवावे


मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्राला महाराष्ट्र भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांच्याकडून अभ्यासपूर्ण किंवा निष्पक्ष भूमिकेची अपेक्षा नसली, तरी महाराष्ट्रातील जनतेसमोर काही सत्य आकडेवारी आणि वास्तव मांडणे गरजेचे असल्याचे सांगत भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. (Rahul Gandhi)


विद्यार्थ्यांच्या ज्या आंदोलनांचा संदर्भ राहुल गांधींनी पत्रात दिला आहे, त्या आदिवासी शाळा प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांकडूनच चालवल्या जात आहेत, असा दावा भाजपने केला आहे. काही दिवसांपूर्वी ज्या शाळेत तीन तरुणींचा सर्पदंशाने मृत्यू झाला, त्या शाळेचे संचालक माजी काँग्रेस खासदार मारोतराव कोवासे हे आहेत, तर त्यांचे सुपुत्र आणि गडचिरोली जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विश्वजित कोवासे हे या शाळेचे सचिव आहेत, अशी माहिती भाजपने दिली. तसेच, यवतमाळमधील चिंधुजी लक्ष्मणराव पुरके आश्रम शाळेच्या तपासणीदरम्यान मुलींच्या स्वच्छतागृहांना दारेच नसल्याचे उघडकीस आले होते, आणि ही शाळा माजी मंत्री तथा काँग्रेस नेते वसंत पुरके यांच्या माध्यमातून चालवली जाते, असेही पत्रात म्हटले आहे. (BJP)



काँग्रेस सत्तेत असताना या शाळांवर चुकीच्या पद्धतीने ताबा मिळवून त्यांचा गैरवापर करण्यात आला, असा आरोप भाजप केला आहे. वर्षानुवर्षे आदिवासी समुदायाचे शोषण करणारेच लोक आता स्वतःला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्यांमागे लपण्याचा प्रयत्न करत आहेत. या काँग्रेस नेत्यांवर होणारी कारवाई रोखण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. (BJP VS Congress)

आधी तेलंगणा आणि कर्नाटकात सुधारणा करा


आधी गैरप्रकार करायचे आणि नंतर त्यावर कारवाई झाल्यावर गोंधळ घालायचा, हा काँग्रेसचा ठरलेला पॅटर्न जनतेला आता चांगल्या प्रकारे समजला आहे. ही नौटंकी थांबवून काँग्रेस नेत्यांना पाठीशी घालणे बंद करावे, असे सांगत महाराष्ट्र सरकार आदिवासी समाज आणि विद्यार्थ्यांच्या रक्षणासाठी पूर्णपणे सक्षम असल्याचे भाजपने स्पष्ट केले. तसेच, राहुल गांधींनी महाराष्ट्रावर बोलण्याआधी स्वतःची सत्ता असलेल्या तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातील आदिवासी कल्याण विभाग व वसतिगृहांची दुरवस्था सुधारण्याकडे लक्ष द्यावे, असा उपरोधिक सल्लाही देण्यात आला आहे. ( Maharashtra News)








Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून