Justice Sunil Shukre : न्या. सुनील शुक्रे यांनी घेतली महाराष्ट्र लोकायुक्त अध्यक्षपदाची पदाची शपथ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे (Justice Sunil Shukre) यांनी मंगळवारी राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतली. लोकभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल ज‍िष्णु देव वर्मा यांनी न्या. सुनील शुक्रे यांना पदाची शपथ दिली. न्या. शुक्रे यांची नियुक्ती २०२३ च्या नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार करण्यात आली असून ही नियुक्ती पाच वर्षांसाठी किंवा ते वयाची ७० वर्षे पूर्ण करेपर्यंत, यापैकी जे अगोदर असेल, त्या दिवशीपर्यंत असेल.



शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मावळते लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे, गोवा राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेचे अन्य सदस्य तसेच मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. (Justice Sunil Shukre)



न्यायमूर्ती (निवृत्त) सुनील शुक्रे (Justice Sunil Shukre) यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९६१ रोजी झाला. त्यांनी १९८० साली पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून एलएलबी पूर्ण केले आणि नागपूर विद्यापीठातून घटनात्मक कायद्यात एलएल.एम. पदवी मिळवली. न्यायिक सेवेत त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. कोल्हापूर येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रजिस्ट्रार (प्रशासन), महाराष्ट्र न्यायिक अकादमी, उत्तन (ठाणे) येथे सहसंचालक, तसेच नागपूर येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केले. मार्च २०११ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल म्हणून पदभार स्वीकारला आणि २०१३ मध्ये त्यांची न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. ऑक्टोबर २०२३ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर महाराष्ट्र शासनाने त्यांची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. (Justice Sunil Shukre)

Comments
Add Comment

BMC : मुंबई महापालिकेत महायुतीचे २०० दिवस पूर्ण; पुढील ५ वर्षांत बदलणार मुंबईचा चेहरामोहरा?

मुंबई महापालिकेत महायुतीच्या सत्तेचे २०० दिवस पूर्ण भाजपच्या कार्यकारीणीत मांडला राजकीय प्रस्ताव पुढील पाच

Gautami Patil's programs Ban Demand : मुंबईतील दहीहंडी व गणेशोत्सवात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवर बंदी घाला; मुंबई शिक्षक मंडळाची मुख्यमंत्री व पोलीस प्रशासनाकडे मागणी

मुंबई : मुंबईतील दहीहंडी, गणेशोत्सव व इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक शालीनता, धार्मिक

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत