Nashik Simhastha Kumbhmela : ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’, २८ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; प्रवेश विनामूल्य

Nashik Simhastha Kumbhmela : नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांसाठी ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ची भक्ती आणि संगीताची पर्वणी विनामूल्य अनुभवता येणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे आयोजित या तीन दिवसीय महोत्सवासाठी कोणतेही प्रवेशशुल्क आकारले जाणार नसून, तिकीट किंवा प्रवेशिका आवश्यक नाही. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. २८ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत प. पू. अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन, तर रात्री ८ ते १० या वेळेत राहुल देशपांडे यांची ‘अभंगवारी’ होणार आहे.




तीन दिवस भक्ती संगम


२९ ऑगस्ट रोजी ‘भक्ती संमेलन’च्या माध्यमातून भारतीय संतपरंपरा, समरसता तसेच राष्ट्रीय दृष्टिकोनातून संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय या विषयांवर विचारमंथन होणार आहे. यानंतर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ह.भ.प. डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन, तर रात्री ८ ते १० या वेळेत कु. मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.


३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ८ या वेळेत श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंहजी हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मणिपूर येथील नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण, तर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. महाराष्ट्राच्या कीर्तन आणि अभंगवारीपासून पंजाबच्या गुरबाणी शबद कीर्तनापर्यंत तसेच मणिपूरच्या पारंपरिक नट संकीर्तनापर्यंत विविध भक्तिपरंपरा एकाच व्यासपीठावर अनुभवता येणार असल्याने, ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ हा नाशिककरांसाठी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मेजवानी ठरणार आहे. (Nashik Simhastha Kumbhmela)




मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन


नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “कुंभ हा सर्वांचा उत्सव आहे. विविध भागांतील भक्तिपरंपरा एकाच व्यासपीठावर आणणारा ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ नाशिककरांनी प्रत्यक्ष अनुभवावा, यासाठी कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेशशुल्क ठेवण्यात आलेले नाही. तिकीट किंवा प्रवेशिका आवश्यक नाही. नागरिक, भाविक, तरुण आणि कुटुंबांनी ठक्कर डोम येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.” (Nashik Simhastha Kumbhmela)



आयोजकांकडून आवाहन


शबद कीर्तनाच्या वेळी अध्यात्मिक भाव जपण्यासाठी उपस्थित भाविकांनी डोक्यावर रुमाल, पदर, ओढणी सदृश ओढणे आवश्यक आहे, अशी विनम्र विनंती करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे पावित्र्य आणि परिसरातील स्वच्छता व शिस्त कायम राहावी, यासाठी गुटखा, पान, बिडी, सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थ कार्यक्रमस्थळी बाळगू नयेत, असे देखील आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. (Nashik Simhastha Kumbhmela)




पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन


कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पार्किंग, वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने करण्यात येत आहे. नागरिकांनी वाहनांसाठी निर्देशित करण्यात आलेल्या पार्किंग ठिकाणीच वाहने उभी करावीत आणि वाहतूक पोलिस तसेच कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सायंकाळच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी कार्यक्रमाच्या वेळेपूर्वी ठक्कर डोम येथे पोहोचावे, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. (Nashik Simhastha Kumbhmela)




‘भक्ती संमेलन’मधून विचारमंथन


२९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘भक्ती संमेलना’त दोन सत्रांमध्ये संतपरंपरेच्या विविध पैलूंवर चर्चा होणार आहे. पहिल्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’ असून ह.भ.प. श्री. पराग महाराज चातुर्मासे हे सत्र समन्वयक असतील. या सत्रात ह.भ.प. श्री. शिवाजी महाराज मोरे, श्री. ष. बृ. प्र. डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी, श्री. महंत श्रीमानस शास्त्री, श्री. सुदर्शन महाराज कपाटे, ह.भ.प. सौ. सुप्रियाताई साठे आणि ह.भ.प. श्री. प्रमोद महाराज जगताप सहभागी होणार आहेत.


दुसऱ्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’ असून डॉ. सदानंद मोरे हे सत्र समन्वयक असतील. या सत्रात ह.भ.प. श्री. राणा महाराज वासकर, ह.भ.प. डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, श्री. जनार्दन हरिजी महाराज, ह.भ.प. श्री. रामकृष्ण महाराज वीर, श्री. मंदार बुवा रामदासी आणि भागवताचार्य प. पू. महंत श्री. चिरडे बाबा सहभागी होणार आहेत. (Nashik Simhastha Kumbhmela)



‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’


स्थळ : ठक्कर डोम, नाशिक


कालावधी : २८ ते ३० ऑगस्ट २०२६


प्रवेश : विनामूल्य; तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नाही

Comments
Add Comment

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.