Cooper Hospital : कुपर रुग्णालयातील एमआयसीयू खाटांची संख्या पोहोचणार ३५वर

- नवीन २५ खाटांचा एमआयसीयू कक्षाची केली जाणार उभारणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात सध्या १० खाटांचे वैद्यकीय अतिदक्षता विभाग अर्थात मेडिकल इंटेसिव्ह केअर युनिट-एमआयसीयू कार्यरत असून वाढत्या रुग्णसंख्येपुढे या खाटांची संख्या अपुरी पडत असल्याने आता एमआयसीयूचा कक्ष वाढवण्यात येणार आहे. यासाठी नवीन एमआयसीयूचा कक्ष उभारुन त्यांमध्ये तब्बल २५ खाटांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे कुपर रुग्णालयातील एमआयसीयूच्या खाटांची संख्या आता ३५ वर पोहोचणार आहे. (Cooper Hospital)


विलेपार्ले येथील डॉ. रुस्तम नर्सी कूपर महापालिका सर्वसाधारण रुग्णालय हे पश्चिम उपनगरातील एकूण ७०० रुग्णशय्या असलेले प्रमुख रुग्णालय आहे. उपनगरीय रुग्णालय असलेल्या रुग्णालयाच्याठिकाणी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैदयकीय महावि‌द्यालयाची उभारणी करण्यात आल्याने आता तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये या रुग्णालयाची भर पडल्याने उपनगरातील हे वैद्यकीय महाविद्यालय व प्रमुख रुग्णालय आहे. (Cooper Hospital)



सद्यस्थितीत, डॉ. रुस्तम नर्सी कूपर महापालिका सर्वसाधारण रुग्णालयामध्ये १० रुग्णशय्या असलेला वैद्यकीय अतिदक्षता विभाग (एमआयसीयू) असून हा रुग्णालयीन इमारतीच्या उच्चस्तर 'एफ' विंग येथे कार्यरत आहे. कूपर महापालिका सर्वसाधारण रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता अतिरिक्त किमान २५ रुग्णशय्येचा वैद्यकीय अतिदक्षता विभाग सुरु करणे आवश्यक आहे. सदयस्थितीत उपलब्ध १० रुग्णशय्येवर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे तात्काळ स्थितीत एमआयसीयू उपचाराकरीता रुग्ण आल्यास एमआयसीयू विभागात अतिरिक्त रुग्णशय्या (बेड) अपु-या पडत आहेत. अशा वेळी संबंधित रुग्णांची गैरसोय होते. उपनगरातील नागरीकांना एमआयसीयूविभागाची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या विभागात बेड्सची संख्या वाढविणे गरजेचे आहे. कूपर महापालिका सर्वसाधारण रुग्णालय येथील वैद्यकिय सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या 'एफ' विंगमधील एमआयसीयू विभागात जागेअभावी बेड्स वाढविणे अशक्य आहे. त्यानुसार नविन एमआयसीयू विभाग कूपर रुग्णालय इमारतीच्या चौथा मजला ए-विंग येथे सुरु करण्यात येणार आहे. (Cooper Hospital)



अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कूपर महापालिका सर्वसाधारण रुग्णालयामध्ये प्रस्तावित एमआयसीयू विभाग हा रुग्णालय इमारतीच्या चौथा मजला ए विंग येथे महानगरपालिका वास्तु विशारद यांच्या आराखड्‌यानुसार बनवण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकिय सेवा देण्याकरीता वातानुकुलित व्यवस्थेसह एअरकंडीशनींग सिस्टीमची व्यवस्था, वैद्यकिय अधिकारी, नर्सिंग-वॉर्ड स्टाफ यांना या विभागात काम करण्यासाठी तसेच रुग्णांच्या दृष्टीने या विभागात प्रकाशमान राखणा-या विद्युत दिव्यांची व्यवस्था, स्टाफ व रुग्ण यांच्या सुरक्षिततेकरीता फायर फायटिंग सिस्टीम, काम करण्यासाठी आवश्यक फर्निचर सुविधा,रुग्णांच्या आवश्यक वैद्रद्यकिय तपासणी दरम्यान सुरक्षितता राखण्यासाठी बेडनुसार मुव्हिंग कर्टनस् ची व्यवस्था, औषधे स्टोअर करण्यासाठी स्टोरेज व आवश्यकतेनुसार पार्टीशन्स सुविधा या सर्व बार्बीचा समावेश करण्यात आला आहे. या कामांसाठी मॅक एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली असून याकरता १२,२८ कोटी रुपये व विविध करांसह १६.०२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. (Cooper Hospital)


काही महिन्यांपूर्वी एमआयसीयू अभावी दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कुपर रुग्णालयातील एमआयसीयूचा कक्ष वाढवून खाटांची संख्या वाढवण्याची मागणी होत होती. या घटनेच्या दरम्यान महापालिकेने यासाठीची निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यानुसार हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. (Cooper Hospital)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने