Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा, दुसऱ्या हप्त्यात 348 कोटी जमा

Ahilyanagar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 36 हजार 424 कर्जदार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. त्यांच्या खात्यावर एकूण 348 कोटी 51 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी कर्जमाफीचा पहिला हप्ता जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये जिल्हा बँकेच्या 66 हजार 139 शेतकऱ्यांना 627 कोटी 47 लाख 26 हजार 562 रुपयांचा लाभ मिळाला होता. आता दुसरा हप्ताही वितरित झाल्याने जिल्हा बँकेच्या कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 1 लाख 2 हजार 563 वर पोहोचली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत एकूण 975 कोटी 98 लाख 48 हजार 631 रुपये जमा झाले आहेत. (Ahilyanagar News)



कर्जाच्या ओझ्याखालील शेतकऱ्यांना मोठा आधार


जिल्हा मध्यवर्ती बँकेसोबतच राष्ट्रीय आणि व्यापारी बँकांच्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळत आहे. आतापर्यंत जिल्हा बँकेच्या 1 लाख 2 हजार 563 आणि राष्ट्रीय व व्यापारी बँकांच्या 12 हजार 652 अशा एकूण 1 लाख 15 हजार 215 शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 1 हजार 114 कोटी रुपये जमा झाले आहेत. कर्जमाफीमुळे पीक कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. आगामी खरीप आणि रब्बी हंगामासाठी लागणारा खर्च, शेतीची मशागत आणि इतर आर्थिक नियोजन करण्यासाठी या मदतीचा फायदा होणार आहे. (Ahilyanagar News)



दुसर्‍या हप्त्यात तालुकानिहाय लाभ


दुसऱ्या हप्त्यात अकोले तालुक्यातील 1 हजार 835 शेतकऱ्यांना 16 कोटी 58 लाख 96 हजार रुपये, जामखेडमधील 2 हजार 446 शेतकऱ्यांना 2 कोटी 36 लाख 19 हजार रुपये, कर्जतमधील 2 हजार 61 शेतकऱ्यांना 20 कोटी 88 लाख 40 हजार रुपये आणि कोपरगावमधील 628 शेतकऱ्यांना 6 कोटी 18 लाख 72 हजार रुपयांचा लाभ मिळाला. अहिल्यानगर तालुक्यातील 1 हजार 841 शेतकऱ्यांना 15 कोटी 80 लाख 43 हजार रुपये, पारनेरमधील 1 हजार 446 शेतकऱ्यांना 10 कोटी 7 लाख 92 हजार रुपये, पाथर्डीतील 2 हजार 68 शेतकऱ्यांना 16 कोटी 13 लाख 42 हजार रुपये आणि राहाता तालुक्यातील 794 शेतकऱ्यांना 6 कोटी 34 लाख 23 हजार रुपये मिळाले.तर संगमनेर तालुक्यातील 1 हजार 536 शेतकऱ्यांना 13 कोटी 42 लाख 90 हजार रुपये आणि श्रीरामपूरमधील 1 हजार 654 शेतकऱ्यांना 14 कोटी 46 लाख 3 हजार रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. (Ahilyanagar News)



सर्वाधिक लाभार्थी छत्रपती संभाजीनगर विभागात


दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक लाभार्थी छत्रपती संभाजीनगर विभागात ३ लाख २ हजार २७३ असून, त्यांच्या खात्यावर २ हजार २८४ कोटी ४४ लाख ६ हजार ५९० रुपये वितरित करण्यात आले. या विभागात बीडमध्ये ४०० कोटी ३२ लाख, छत्रपती संभाजीनगरमध्ये २८७ कोटी ३२ लाख, धाराशिवमध्ये १८३ कोटी ८५ लाख, हिंगोलीमध्ये १९५ कोटी ६१ लाख, जालन्यात ३६६ कोटी २७ लाख, लातूरमध्ये १२१ कोटी ७ लाख, नांदेडमध्ये ३८१ कोटी ९४ लाख आणि परभणीत ३४८ कोटी २ लाख रुपये वितरित करण्यात आले.

Comments
Add Comment

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात