Central Railway Block : कसारा मार्गावर १५ रात्रींचा ब्लॉक; टिटवाळा स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टिटवाळा स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी २८ ऑगस्टच्या रात्रीपासून ११ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत तब्बल १५ रात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. टिटवाळा स्थानकाचा प्लॅटफॉर्म १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांसाठी योग्य करण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. (Central Railway Block)


या ब्लॉकमुळे कसारा मार्गावरील लोकल सेवांच्या वेळापत्रकात मोठे बदल होणार असून काही लोकल रद्द, काही गाड्या अंशतः रद्द करण्यात येणार आहेत. काही लोकलचे प्रवासाचे ठिकाण बदलले जाणार आहे.



पहिल्या टप्प्यात रात्री ५ तास ४० मिनिटांचा ब्लॉक :


२८ ऑगस्टच्या रात्रीपासून १ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत ब्लॉकचा पहिला टप्पा राबवण्यात येणार आहे. या काळात दररोज रात्री ११.३० ते पहाटे ५.१० वाजेपर्यंत म्हणजेच सुमारे ५ तास ४० मिनिटांचा ब्लॉक असेल. कल्याण ते वासिंददरम्यान अप आणि डाउन नॉर्थ-ईस्ट मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे टिटवाळा ते कसारा दरम्यान धावणाऱ्या रात्रीच्या आणि पहाटेच्या लोकल सेवांवर विशेष परिणाम होणार आहे. (Central Railway Block)



अनेक लोकल रद्द; काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट :


२८ ऑगस्टच्या रात्री काही CSMT-टिटवाळा आणि CSMT-कसारा लोकल रद्द करण्यात येणार आहेत. टिटवाळाहून CSMT आणि ठाण्याकडे जाणाऱ्या काही सेवांमध्येही बदल करण्यात आले आहेत.


रात्री ८.५६ वाजता सुटणारी CSMT-असणगाव लोकल टिटवाळ्यापर्यंतच धावणार आहे. तर रात्री १० वाजण्याच्या सुमारास सुटणाऱ्या डोंबिवली-CSMT आणि कल्याण-CSMT लोकल ठाणे स्थानकापर्यंतच धावतील. ब्लॉकपूर्वी कसाऱ्यासाठी शेवटची लोकल CSMTहून रात्री १०.४७ वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर CSMTहून पहिली सेवा पहाटे ४.१९ वाजता, तर कसारा-CSMT पहिली लोकल कसाऱ्याहून पहाटे ३.५१ वाजता सुटणार आहे. (Central Railway Block)



टिटवाळ्याऐवजी असणगावपर्यंत लोकल धावणार :


२९ ऑगस्टच्या रात्रीपासून १ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत आणखी काही लोकल रद्द किंवा शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. या कालावधीत टिटवाळ्यापर्यंत जाणाऱ्या सर्व लोकल असणगावपर्यंत वाढवण्यात येतील. त्याचप्रमाणे टिटवाळ्याहून सुरू होणाऱ्या काही लोकल असणगावहून सुरू करण्यात येणार आहेत. काही सेवांचा प्रवास ठाणे किंवा कल्याणपर्यंत मर्यादित केला जाणार आहे. (Central Railway Block)



AC लोकलवरही परिणाम :


सकाळी ६.३० वाजता CSMTहून टिटवाळ्यासाठी सुटणारी AC लोकल तसेच दुपारी ३.३३ वाजता दादरहून टिटवाळ्यासाठी सुटणारी AC लोकल या कालावधीत केवळ ठाण्यापर्यंत धावणार आहे. CSMT-टिटवाळा मार्गावरील इतर काही लोकल ठाणे किंवा कल्याणपर्यंतच धावतील. तर टिटवाळा-CSMT मार्गावरील काही सेवा ठाणे किंवा कल्याण येथून सुरू करण्यात येणार आहेत. (Central Railway Block)



मेल-एक्स्प्रेस गाड्यांनाही विलंब :


या ब्लॉकचा परिणाम काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवरही होणार आहे. गोरखपूर-दादर आणि बलिया-दादर एक्स्प्रेस काही निश्चित रात्री वासिंद किंवा आटगाव येथे नियंत्रित केल्या जाणार आहेत. तसेच जननगरी एक्स्प्रेस, शालीमार-LTT एक्स्प्रेस, हावडा-CSMT मेल आणि मऊ-LTT एक्स्प्रेस या गाड्या मुंबईत सुमारे १० ते २० मिनिटे उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे. (Central Railway Block)



उर्वरित ब्लॉकची माहिती स्वतंत्रपणे जाहीर होणार :


मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे की, पायाभूत सुविधांचे काम आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे ब्लॉक आवश्यक आहेत. १ सप्टेंबरनंतरच्या उर्वरित ब्लॉकची माहिती स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे कसारा मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी लोकलचे सुधारित वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. (Central Railway Block)

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर