Coastal Road-Sea Link Traffic Rules : मुंबईतील कोस्टल रोड आणि सी-लिंकवर वाहतूक निर्बंध; 'या' वाहनांना कायमस्वरुपी बंदी

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड) आणि राजीव गांधी सागरी सेतू (बांद्रा-वरळी सी-लिंक) मार्गावर वाहतूक शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी कायमस्वरुपी वाहतूक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) मोक्षदा पाटील यांनी जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार, या मार्गांवर काही विशिष्ट प्रकारच्या वाहनांना कायमस्वरुपी प्रवेशबंदी असणार आहे. (Coastal Road-Sea Link Traffic Rules)



'या' वाहनांना कायमस्वरुपी प्रवेशबंदी :


कोस्टल रोड आणि बांद्रा-वरळी सी-लिंकवर सर्व प्रकारची मालवाहू वाहने, टेम्पो, ट्रक, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर आणि अवजड वाहनांना प्रवेश करता येणार नाही. मात्र, BEST बसेस, एसटी बसेस, इतर प्रवासी बसेस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने आणि आपत्कालीन सेवांशी संबंधित अवजड वाहने यांना या नियमातून वगळण्यात आले आहे. (Coastal Road-Sea Link Traffic Rules)


याशिवाय दुचाकी, सायकल, मोपेड, अपंग व्यक्तींसाठीची मोटारसायकल, स्कूटर आणि साइडकार असलेल्या स्कूटरसह सर्व प्रकारच्या दुचाकी वाहनांना प्रवेशबंदी कायम राहणार आहे. सर्व प्रकारच्या तीनचाकी वाहनांनाही या मार्गांवर प्रवेश करता येणार नाही. तसेच जनावरांनी ओढल्या जाणाऱ्या गाड्या, टांगा, बैलगाडी, घोडागाडी आणि हातगाड्यांनाही प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. पादचाऱ्यांनाही या मार्गावर प्रवेश करता येणार नाही. (Coastal Road-Sea Link Traffic Rules)



वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित :


या मार्गावर वाहनांच्या वेगावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. सरळ मार्गावर कमाल ८० किमी प्रतितास, तर बोगद्यात कमाल ६० किमी प्रतितास वेगमर्यादा असेल. वळण आणि जंक्शनच्या ठिकाणी वाहनांचा वेग ४० किमी प्रतितास इतका मर्यादित ठेवण्यात आला आहे. (Coastal Road-Sea Link Traffic Rules)



वाहन थांबवणे, प्रवासी उतरवणे-चढवणे बंद :


कोस्टल रोड आणि सी-लिंकवर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मार्गावर अनावश्यकपणे वाहने थांबवण्यास बंदी असेल. तसेच प्रवासी चढवणे किंवा उतरवणे आणि रस्त्यावर फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यासही मनाई करण्यात आली आहे. (Coastal Road-Sea Link Traffic Rules)



कोस्टल रोड-सी लिंक २४ तास वाहतुकीसाठी खुला :


धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग हा राजीव गांधी सागरी सेतूशी कनेक्टर ब्रिजद्वारे जोडण्यात आला आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून मरीन ड्राइव्ह ते बांद्रा टोल प्लाझापर्यंतच्या दक्षिण आणि उत्तर वाहिन्या प्रवासी वाहनांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. कोस्टल रोड आणि बांद्रा-वरळी सी-लिंकच्या सर्व वाहिन्या, पूल, अंडरपास आणि बोगदे २४ तास, सातही दिवस वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे यापूर्वी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या तात्पुरत्या अधिसूचना रद्द करून वाहतूक नियमांसाठी एकत्रित अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (Coastal Road-Sea Link Traffic Rules)



प्रवाशांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन :


कोस्टल रोड आणि सी-लिंक हे मुंबईतील महत्त्वाचे वेगवान वाहतूक मार्ग असल्याने वाहनचालकांनी निर्धारित वेगमर्यादेचे पालन करणे आणि प्रतिबंधित वाहनांनी या मार्गाचा वापर न करणे आवश्यक आहे. वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Coastal Road-Sea Link Traffic Rules)

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन