BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका















मुंबई : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य करण्यात येणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. मात्र, हे वृत्त वस्तुस्थितीला धरून नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. (BMC)


एक टनापेक्षा अधिक वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा कोणताही निर्णय महापालिकेने घेतलेला नाही. तसेच मूर्तीच्या जडणघडणीपासून ते गणेश मंडळाला वितरण होईपर्यंतची संपूर्ण माहिती नोंदवणे बंधनकारक करण्याबाबतही कोणतेही निर्देश जारी करण्यात आलेले नाहीत. ( BMC Ganesh Utsav Guidelines)



त्यामुळे सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अशा संदेशांवर नागरिक आणि गणेश मंडळांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. ( Ganeshotsav 2026)



गणेशमूर्तींच्या आगमनावेळी सुरक्षेची काळजी घ्या


दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तींच्या आगमन सोहळ्यादरम्यान सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. गणेश मंडळांनी आगमन सोहळ्याचे नियोजन करताना पोलीस विभाग, वाहतूक विभाग आणि मुंबई महापालिकेशी आवश्यक समन्वय साधावा, असे प्रशासनाने सांगितले.


गणेशोत्सव उत्साहात, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडण्यासाठी सर्व मंडळांनी संबंधित यंत्रणांच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. ( Mumbai Mayor BMC News)









Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने