Bhuleshwar Cha Raja : भुलेश्वरच्या राजा मूर्ती दुर्घटनेचा तपास सुरू; शिल्पकार अनिकेत देसाईंचा पोलिसांनी नोंदवला जबाब

मुंबई : मुंबईतील भुलेश्वरच्या राजा गणेश मूर्तीच्या आगमन सोहळ्यादरम्यान मूर्ती कोसळून दोन मंडळ पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी (LT Marg Police) दोन अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवले आहेत. ( Bhuleshwar Cha Raja)


तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गणेशमूर्तीचे शिल्पकार अनिकेत देसाई यांचा जबाब नोंदवला. यापूर्वी पोलिसांनी आगमन सोहळ्यावेळी उपस्थित असलेले मंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि प्रत्यक्षदर्शी अशा सुमारे १५ ते २० जणांचे जबाब नोंदवले आहेत.



शिल्पकाराला चौकशीसाठी नोटीस


पोलिसांच्या माहितीनुसार, अनिकेत देसाई यांची बकरी अड्डा परिसरात तात्पुरती कार्यशाळा आहे. मंडळाने दिलेल्या तपशीलानुसार त्यांनी भुलेश्वरच्या राजाची मूर्ती तयार केली होती. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत देसाई यांनी यापूर्वी १९ फूट उंच मूर्ती तयार केली होती, मात्र एवढ्या मोठ्या उंचीची मूर्ती तयार करण्याचे काम त्यांनी पहिल्यांदाच हाती घेतल्याची माहिती समोर आली आहे. ( Sculptor Aniket Desai Statement)


दुर्घटनेनंतर पोलिसांनी देसाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उपलब्ध नसल्याने पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशीसाठी नोटीस बजावली. त्यानुसार ते मंगळवारी सकाळी एलटी मार्ग पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांचा जबाब नोंदवण्यात आला असून, मूर्ती तयार करताना वापरण्यात आलेली सामग्री, वेल्डिंग आणि संरचनेशी संबंधित बाबींची चौकशी केली जात आहे. ( Mumbai Police Investigation)



लालबागच्या राजाकडून भुलेश्वर मंडळाला मदतीचा हात


दरम्यान, दुर्घटनेनंतर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला मदतीचा हात दिला आहे.


लालबागच्या राजा मंडळाने भुलेश्वरच्या राजा मंडळाला ११ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोन्ही मंडळ पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.


लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी ही मदत जाहीर केली. दुर्घटनेनंतर बाधित कुटुंबे आणि भुलेश्वर मंडळाच्या पाठीशी उभे राहण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने