'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली असून, २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे भक्ती, संगीत आणि भारतीय सांस्कृतिक परंपरांचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. प्रवेश विनामूल्य असून तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नाही. नाशिककर भाविक, विद्यार्थी व सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत केले.



उद्घाटनानंतर सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन, तर रात्री ८ ते १० या वेळेत राहुल देशपांडे यांचा ‘अभंगवारी’ कार्यक्रम होईल.२९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ आणि दुपारी २ ते ४ या वेळेत ‘भक्ती संमेलन’ होणार आहे. ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’ या विषयावरील पहिल्या सत्राचे समन्वयक पराग महाराज चातुर्मासे असून, शिवाजी महाराज मोरे, डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, महंत श्रीमानस शास्त्री, सुदर्शन महाराज कपाटे, सुप्रिया साठे आणि प्रमोद महाराज जगताप सहभागी होतील. राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’ या विषयावरील दुसऱ्या सत्राचे समन्वयक डॉ. सदानंद मोरे असतील. श्री राणा महाराज वासकर, डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, जनार्दन हरिजी महाराज, रामकृष्ण महाराज वीर, मंदार बुवा रामदासी आणि महंत श्री. चिरडे बाबा सहभागी होतील. सायंकाळी डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन आणि रात्री कु. मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल.


?si=AdL0RVuBx6z-8_Wh


यानंतर ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ८ या वेळेत श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन होईल. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण, तर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल. ‘कुंभ भक्ती संगम’ हा नाशिककर आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी भक्ती, संगीत व विविध भारतीय परंपरांचा अनुभव घेण्याची संधी आहे. नागरिकांनी कुटुंबीय व मित्रपरिवारासह उपस्थित राहावे, असेही सिंह यांनी सांगितले. शबद कीर्तनावेळी भाविकांनी अध्यात्मिक भाव जपण्यासाठी शिर झाकून ठेवावे. तसेच कार्यक्रमाचे पावित्र्य, स्वच्छता व शिस्त कायम राखण्यासाठी गुटखा, पान, बिडी, सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments
Add Comment

Nashik News : सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन , नाशिकमध्ये खळबळ

Malegaon News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील सहकार निबंधक कार्यालयातील

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Gold Silver Rate Today : सोनं-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ! ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा

Gold Silver Rate Today : सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले