Nashik : प्रेयसीचा रुसवा घालवण्यासाठी कॉलेजसमोर लावला ‘सॉरी’चा बॅनर, रोमँटिक अंदाजात माफी मागणं पडलं महागात, पुढे घडलं असं काही की...

Nashik : प्रेयसीचा रुसवा घालवण्यासाठी नाशिकमधील एका तरुणाने चक्क कॉलेजसमोर मोठा ‘सॉरी’चा बॅनर लावल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, प्रेयसीची माफी मागण्याचा हा प्रयत्न तरुणाला चांगलाच महागात पडलाय. सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी बॅनर लावून मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणासह बॅनर छापून देणाऱ्या प्रिंटिंग प्रेस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अशा या आगळ्यावेगळ्या सॉरीची चर्चा जिल्ह्यात रंगलीय. (Nashik News)



नेमकं प्रकरण काय ?


दिंडोरी रोडवरील (Dindori Road) एका कॉलेजसमोर चार दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास झाडावर मोठा बॅनर लावलेला आढळून आला. गुलाबी आणि लाल रंगातील बदामाच्या आकृत्यांसह त्यावर मोठ्या अक्षरांत ‘SORRY’ असे लिहिण्यात आले होते. हा बॅनर पाहिल्यानंतर परिसरात त्याची चांगलीच चर्चा रंगली. मात्र, बॅनर लावण्यासाठी पोलिस किंवा महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. म्हसरूळ पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार दीपक अरगडे गस्तीवर असताना त्यांना या बॅनरची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आणि बॅनर तातडीने काढून टाकला. (Nashik News)



बॅनर छापला अन् रात्री झाडावर लावला


यानंतर बॅनर कोणी लावला, याचा तपास सुरू करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. या तपासात ‘श्री आर्ट डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग’चे चालक रूपेश सुदाम लोहार यांच्यापर्यंत पोलिस पोहोचले. चौकशीत या बॅनरसाठी रविवार पेठ परिसरातील २७ वर्षीय आदित्य गणेश शेलार (Aditya Ganesh Shelar) याने ऑर्डर दिल्याचे समोर आले. प्रेयसीचा रुसवा घालवण्यासाठी आदित्यने बॅनर छापून घेतला आणि रात्रीच्या वेळी कॉलेजसमोरील झाडावर तो लावल्याची माहिती तपासात पुढे आली. (Nashik News)



आगळ्यावेगळ्या माफीची चर्चाच चर्चा


प्रेयसीची माफी मागण्याचा हा अनोखा प्रयत्न परिसरात चर्चेचा विषय ठरला असला, तरी सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात कारवाई केली आहे. महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा, १९९५ मधील कलम ३ अंतर्गत म्हसरूळ पोलिस ठाण्यात (Mhasrul Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमात रुसवा-फुगवा असतोच, मात्र माफी मागताना कायद्याच्या चौकटीचेही भान ठेवणे गरजेचे आहे, हे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे.

Comments
Add Comment

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

Nashik News : सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन , नाशिकमध्ये खळबळ

Malegaon News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील सहकार निबंधक कार्यालयातील

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Gold Silver Rate Today : सोनं-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ! ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा

Gold Silver Rate Today : सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या