Rustomjee Crown Unauthorized Construction : प्रभादेवीतील 'रुस्तमजी क्राउन’ इमारतीतील अनधिकृत बाधकामांवर महापालिकेचा हातोडा

- दोन दिवसांमध्ये १० सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई


- तब्बल १२८ सदनिका धारकांना नोटीस ; तब्बल महिनाभर सुरू राहणार कारवाई



मुंबई (विशेष प्रतिनिधी)


प्रभादेवी येथील क्राऊन मिल कंपाउंडमधील आलिशान निवासी संकुल असलेल्या ‘रुस्तमजी क्राउन’ इमारतीत झालेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात मुंबई महापालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात चार सदनिकांमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्यानंतर मंगळवारी सहा मजल्यांवरील सदनिकांमधील वाढीव बांधकामांवरही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई करण्यात आली असून बुधवारी सुट्टी असल्याने उर्वरीत बांधकामांवरील कारवाई गुरुवारी केली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. (Rustomjee Crown Unauthorized Construction)



माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये याबाबतची तक्रार दाखल करत रुस्तमजी क्राउनमधील १२८ सदनिकांच्या मालकांनी लिफ्टच्या आजूबाजूच्या सामाईक जागेवर अतिक्रमण करून ती जागा आपल्या सदनिकांमध्ये समाविष्ट केल्याचा आरोप तक्रारीत केला होता. त्यानुसार तत्कालिन जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी याची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर महापालिका जी-दक्षिण विभागातील इमारत व कारखाना विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी मार्च २०२६ मध्ये संबंधित सर्व सदनिकांना मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम ३५४-अ तसेच एमआरटीपी कायद्यातील कलम ५३(१) अंतर्गत कथित अनधिकृत बांधकामाबाबत नोटिसा बजावल्या होत्या. महापालिकेने एकूण १३८ सदनिका धारकांना नोटीस पाठवली आहे. या सदनिका राजकारणी, सनदी अधिकारी आणि नामवंत व्यावसायिकांशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेच्या कारवाईने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Rustomjee Crown Unauthorized Construction)



महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत तीन तळघर, तळमजला आणि ६३ मजले आहेत. ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ या निवासी विंग्स १४व्या ते ६३व्या मजल्यांदरम्यान आहेत. ‘ए’ आणि ‘बी’ विंगमध्ये प्रत्येकी १८६ सदनिका असून, त्यांना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले आहे. सोमवारी चार सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई केल्यानंतर 'ए' विंगमधील २०, २८, ३२, ३६, ३७,३८ मजल्यावरील सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच चार मजल्यांवरील सदनिका धारकांनी स्वत:चे वाढीव बांधकाम तोडून टाकले आहे. त्यामुळे एकूण १२८ पैंकी १४ सदनिकांची वाढीव बांधकामे हटवण्यात आली आहे. (Rustomjee Crown Unauthorized Construction)

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा