Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती आगमन सोहळ्यादरम्यान क्रेनवरून कोसळून दोन मंडळ पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास एल. टी. मार्ग पोलीस करत असून, पोलिसांनी मूर्तिकार अनिकेत देसाई यांचा जबाब नोंदवला आहे. ( Bhuleshwar Cha Raja)


देसाई यांच्या चौकशीत मूर्ती आगमन सोहळ्यासाठी कारखान्यातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या १०० ते १५० मीटर अंतरावरच तिच्या पाठीमागील मुख्य वेल्डिंग तुटल्याची माहिती समोर आली आहे.



वेल्डिंग तुटले अन् मूर्ती पुन्हा कारखान्यात नेली


मूर्तीचे वेल्डिंग तुटल्याचे लक्षात आल्यानंतर ती पुन्हा कारखान्यात आणण्यात आली. तेथे तातडीने वेल्डिंग करून आवश्यक दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मूर्ती पुन्हा आगमन सोहळ्यासाठी नेल्याचे मूर्तिकाराने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. ( Ganeshotsav 2026)


आगमनाच्या वेळी पुन्हा वेल्डिंग तुटल्याने मूर्तीचा समतोल बिघडला आणि त्यानंतर ती कोसळल्याची शक्यता तपासातून समोर येत आहे. मात्र, दुर्घटनेमागील नेमकी कारणे आणि सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास अद्याप सुरू आहे.



मूर्ती लवकर नेण्याबाबतही सूचना?


दरम्यान, यापूर्वी मूर्तिकार अनिकेत देसाई यांनी मंडळाला मूर्ती आणखी काही दिवस कारखान्यात ठेवण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त समोर आले होते. मूर्ती पूर्णपणे सुकलेली नसल्याने तसेच काही काम बाकी असल्याने आणखी सुमारे १० दिवसांनी मूर्ती नेण्याची सूचना करण्यात आली होती, अशी माहिती आहे. ( Mumbai Ganeshotsav News)


मात्र, डेकोरेटरच्या वेळापत्रकामुळे मूर्ती लवकर नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता मूर्तीच्या बांधकामाची स्थिती, वेल्डिंग, वाहतूक आणि आगमन सोहळ्यादरम्यान घेतलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांचा पोलीस तपास करत आहेत.


या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी ब्रिजेश जोशी यांचा मृत्यू झाला होता, तर दोन लहान मुलींसह पाच जण जखमी झाले होते. त्यामुळे या प्रकरणातील तपासाकडे गणेश मंडळांचे तसेच गणेशभक्तांचे लक्ष लागले आहे. ( Ganesha Idol Incident)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने