Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी, अभिनेत्री अरुणा इराणी (Aruna Irani) आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. पतीला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी अत्यंत भावूक झाल्या होत्या. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कुटुंबातील सदस्य त्यांना सावरताना दिसत आहेत.


चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचे २५ ऑगस्ट रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. कुकू कोहली यांची अंत्ययात्रा अंधेरी पश्चिम येथील त्यांच्या 'ग्रीन एकर्स' या निवासस्थानापासून सुरू झाली. ओशिवरा स्मशानभूमीत कुटुंबीय आणि जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांना अश्रूपूर्ण निरोप दिला. एका व्हिडिओमध्ये अरुणा इराणी पांढऱ्या वस्त्रात दिसत असून, पतीला गमावल्याचे अतीव दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्या ढसाढसा रडताना दिसत आहेत. या भावूक दृश्यांनी त्यांचे चाहते आणि चित्रपटसृष्टीतील मंडळींनाही हेलावून सोडले.



कुकू कोहली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित राहिले. विकी कौशल, कतरिना कैफ, अशोक पंडित आणि रोहित शेट्टी यांच्यासह अनेक कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी दिवंगत दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहिली. कुकू कोहली यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उल्लेखनीय चित्रपटांचे दिग्दर्शन केले. विशेष म्हणजे, 'फूल और कांटे' या चित्रपटाद्वारे त्यांनी अजय देवगणला अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत आणले. 'सुहाग', 'हकीकत' आणि 'ये दिल आशिकाना' यांसारख्या चित्रपटांसाठीही ते ओळखले जातात. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीने एक अनुभवी चित्रपट निर्माता गमावला आहे. (Kuku Kohli)

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’