Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार



Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.







  • गाडी क्रमांक 01007 (CSMT ते मडगांव): ही विशेष गाडी दिनांक ११.०९.२०२६ आणि १३.०९.२०२६ रोजी मध्यरात्री ००:४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:३० वाजता मडगांव येथे पोहोचेल.




  • गाडी क्रमांक 01008 (मडगांव ते CSMT): ही गाडी दिनांक ११.०९.२०२६ आणि १३.०९.२०२६ रोजी मडगांव येथून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.





प्रमुख थांबे


या दोन्ही गाड्या दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबतील.



गाडीची संरचना


प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्यांमध्ये एकूण २२ डब्यांची रचना असणार आहे. यात २ वातानुकूलित तृतीय (AC 3-Tier), १२ शयनयान (Sleeper), ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.



आरक्षण आणि तिकीट बुकिंग


गाडी क्रमांक 01007 या आरक्षित विशेष गाडीसाठी बुकिंग दिनांक २९.०८.२०२६ पासून सर्व पीआरएस (PRS) केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. तसेच, सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांचे बुकिंग 'यूटीएस' (UTS) प्रणालीद्वारे करता येणार असून, प्रवासी तिकीट बुकिंगसाठी 'रेलवन ॲप' देखील डाउनलोड करू शकतात. थांब्यांच्या वेळेबद्दल सविस्तर माहितीसाठी एनटीईएस संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






Comments
Add Comment

BMC Water Pipeline Leakage : पाणी गळती दुरुस्तीच्या कामांसाठी घाटकोपरला २७ कोटींचा ‘बूस्टर’!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर भागातील जलवाहिनीतून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या जल

Kandivali : स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन बस अपघातातील जखमी युवकावर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात उपचारास नकार!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मालाड – मार्वे रोड, स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे झालेल्या भीषण बस अपघातात २१

Kandivali : कांदिवलीतील डॉ.बाबासाहेब रुग्णालयातील साहित्य खरेदीत गैरव्यवहार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या कांदिवलीतील (Kandivali) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापालिका

BMC : घाटकोपर, मानखुर्द चेंबूर परिसरातील ०६ अनधिकृत लॉजवर जप्तीची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अनधिकृत व्यवसाय आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात महानगरपालिकेकडून कारवाई सुरू आहे. या

मुंबईत ५१ दिवसांमध्ये १६,१५३ बॅनरांची फाडाफाडी

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या बॅनरबाजांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात असून

मुंबई पुस्तक महोत्सवाला राज्यपालांची हजेरी! विविध पुस्तक दालनांची पाहणी; पुस्तकांचीही केली खरेदी

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भेट