Mumbai Metro 7A : MMRDA चा अजब कारभार! २६० कोटींचा मेट्रो पूल आता पाडणार? २.५ मीटरच्या उंचीने काम अडचणीत

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) मेट्रो प्रकल्पासंदर्भात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो 7A मार्गिकेतील सुमारे एक किलोमीटर लांबीचा पूल उभारल्यानंतर आता तो पाडण्याची वेळ येऊ शकते. या पुलासाठी तब्बल २६० कोटी रुपये खर्च झाल्याचे वृत्त आहे. (Mumbai Metro 7A)


विमानतळ परिसरातील सुरक्षिततेच्या नियमांशी संबंधित तांत्रिक बाब आराखड्यात योग्य पद्धतीने विचारात न घेतल्याने हा पेच निर्माण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामावर परिणाम होण्यासोबतच मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता निर्माण झाली आहे. (Mumbai Metro 7A)



नेमका वाद काय?


विमानतळ परिसरातील एअरपोर्ट फनेल झोनमध्ये बांधकाम करताना विमानांच्या सुरक्षित उड्डाणासाठी निश्चित केलेल्या उंचीच्या मर्यादांचे पालन करणे आवश्यक असते. मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक (OHE) वायरची अतिरिक्त उंची आराखडा तयार करताना योग्य प्रकारे विचारात घेतली गेली नसल्याचे वृत्त समोर आले आहे. OHE वायरची उंची सुमारे २.५ मीटरने अधिक होत असल्याने विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा गंभीर बनला. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) या अतिरिक्त उंचीला परवानगी नाकारल्याने प्रकल्पाचे काम अडचणीत आले. (Mumbai Metro 7A)



सल्लागार कंपन्यांच्या आराखड्यावर प्रश्न :


मेट्रो मार्गिकेचा आराखडा तयार करण्याचे काम Systra, CEG आणि SMCIPL या सल्लागार कंपन्यांच्या युतीकडे होते. २०२२ मध्ये प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या घेताना OHE वायरच्या उंचीचा योग्य विचार झाला नसल्याचे समोर आले. २०२५ मध्ये ही तांत्रिक बाब निदर्शनास आल्यानंतर संबंधित काम थांबवण्यात आले. फेब्रुवारी २०२६ पर्यंत या भागातील पूल, रॅम्प आणि ‘एअरपोर्ट कॉलनी’ स्टेशनचे ९५ टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण झाले होते. (Mumbai Metro 7A)



२६० कोटींचा पूल पाडावा लागणार?


उपलब्ध माहितीनुसार, या समस्येवर तांत्रिक तोडगा निघाला नाही, तर आधीच उभारण्यात आलेला पूल आणि संबंधित बांधकाम पाडून नव्याने बांधकाम करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, आधी खर्च झालेल्या निधीच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. (Mumbai Metro 7A)



मेट्रो 7A ला पुन्हा विलंब?


गुंदवली ते विमानतळाला जोडणाऱ्या सुमारे ३.४ किलोमीटरच्या मेट्रो 7A मार्गिकेचे काम यापूर्वीच अनेक कारणांमुळे रखडले आहे. या मार्गिकेमुळे पश्चिम उपनगरातून विमानतळ गाठणे अधिक सोयीचे होणार आहे. मात्र, पूल आणि विमानतळ परिसरातील तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्पाच्या वेळापत्रकावर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता आहे. (Mumbai Metro 7A)


त्यामुळे २०२६-२७ या आर्थिक वर्षात मेट्रो 7A सुरू होईल का, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या मार्गिकेच्या कामाला आता तांत्रिक अडथळा कसा दूर केला जातो, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. (Mumbai Metro 7A)


Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने