Nashik News : खळबळजनक ! गोदापात्रात बुडून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Nashik News : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या पंचवटी येथील गोदापार्क परिसरातील (Goda Park Area) जॉगिंग ट्रॅकजवळ गोदावरी नदीच्या पात्रात बुडून एका ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (२६ ऑगस्ट) दुपारी उघडकीस आली असून शुभम मारुती पवार (वय ३२, रा. प्रथम रो बंगलो, समर्थ नगर, पेठ रोड, शरद पवार मार्केट यार्डामागे) असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या अचानक जाण्याने समर्थ नगर व पेठ रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nashik News)



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास शुभम पवार हा तरुण (Youth) गोदापार्क नदीपात्रात जॉगिंग ट्रॅकजवळ पाण्यात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. ही बाब निदर्शनास येताच त्याचा आतेभाऊ निलेश नंदू गुंजाळ यांनी स्थानिकांच्या मदतीने त्याला तातडीने पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गांगुर्डे मॅडम यांनी तपासून शुभम मारुती पवार यास मृत घोषित केले. या घटनेनं शुभम पवारच्या कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nashik News)


या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Polie Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार एस. एस. बाविस्कर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास