USA Murder Case : अमेरिकेत प्रेयसीची हत्या केली, भारतात ठिकाना लावला...अन् आरोपीला आग्र्यातून अटक!

अमेरिकेत आपल्या प्रेयसीची भयंकर हत्या करून भारतात पळून आलेल्या एका आरोपीला आग्रा येथून पोलिसांनी अटक केली आहे. अर्जुन शर्मा (Arjun Sharma) असे या आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअरचे नाव आहे. अमेरिकन पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी तो आग्रा येथील एका अपार्टमेंटमध्ये नाव व ओळख लपवून राहत होता. मात्र, हैदराबाद पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. अटकेनंतर त्याला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला अमेरिकन प्रशासनाच्या स्वाधीन (प्रत्यर्पण) केले जाण्याची शक्यता आहे.



पैशांच्या वादातून प्रेयसीचा खून अन्...


हे संपूर्ण प्रकरण अमेरिकेतील मॅरिलँड राज्यातील हॉवर्ड काउंटी परिसरातील आहे. तिथे २७ वर्षांच्या निकिता गोडिशाला या तेलगू तरुणीची चाकूने भोसकून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना ३१ डिसेंबर ते २ जानेवारी २०२६ या काळात घडली होती. निकिता आणि अर्जुन यांच्यात पैशांवरून मोठा वाद सुरू होता आणि याच वादातून तिच्या माजी प्रियकराने (अर्जुन) तिची हत्या केल्याचा आरोप निकिताच्या वडिलांनी केला आहे. हत्येचा हा प्रकार अमेरिकन पोलिसांच्या लक्षात येण्यापूर्वीच अर्जुन तेथून पळून भारतात आला होता.



आग्रा येथील अपार्टमेंटमध्ये भाड्याने घेतला होता फ्लॅट


अमेरिका सोडून भारतात आल्यानंतर आरोपी अर्जुन शर्मा सुमारे १५ दिवसांपूर्वी आग्रा येथे पोहोचला होता. तेथील एकता पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या 'शंकर ग्रीन अपार्टमेंट'मध्ये त्याने १२ व्या मजल्यावर फ्लॅट नंबर १२०२ भाड्याने घेतला. तिथे तो कोणतीही नोकरी न करता ओळख लपवून राहत होता. दरम्यान, हैदराबादच्या लल्लागुडा पोलीस ठाण्याच्या पथकाला आरोपीचा माग काढण्यात यश आले. हैदराबाद पोलिसांनी आग्रा पोलिसांच्या मदतीने अपार्टमेंटवर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.



अमेरिकेकडून हस्तांतरणाची मागणी; कायदेशीर प्रक्रिया सुरू


अटकेनंतर अर्जुनला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अनिमेष भास्कर मणी त्रिपाठी यांच्यासमोर हजर करण्यात आले. अमेरिकन प्रशासनाने अर्जुनविरोधात आधीच गैर-जमानती वॉरंट जारी केले असून त्याला अमेरिकेत परत पाठवण्यासाठी भारत सरकारकडे अधिकृत विनंती केली आहे. न्यायालयाने या सर्व बाबी लक्षात घेऊन आरोपीची कोठडीत रवानगी केली आहे. आता आवश्यक त्या कायदेशीर औपचारिक बाबी पूर्ण करून त्याला लवकरच अमेरिकन पोलिसांच्या हवाली केले जाईल.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि