Delhi Crime: मध्यरात्री थरार! मुस्कानच्या मारेकरी इमरानचा दिल्ली पोलिसांकडून एन्काऊंटर

दिल्ली : दिल्लीतील टिळक नगर परिसरात 21 वर्षीय मॉडेल आणि विद्यार्थिनी मुस्कान हिच्या हत्या प्रकरणात गुरुवारी रात्री मोठी घडामोड घडली. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि मुस्कानचा जिम ट्रेनर इमरान याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफने राजौरी गार्डन परिसरात झालेल्या चकमकीनंतर ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, चकमकीदरम्यान इमरानच्या पायाला गोळी लागली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Delhi Crime)


मुस्कानच्या हत्येनंतर इमरान फरार झाला होता. तो वारंवार आपले ठिकाण बदलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुरुवारी रात्री तो राजौरी गार्डनमधील नाला रोड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्पेशल स्टाफच्या पथकाने परिसरात सापळा रचला. (Muskan Murder Case)



इमरान घटनास्थळी पोहोचताच त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले. चकमकीनंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून काडतुसे आणि इतर पुरावे जमा केले आहेत.(Delhi Police)


दरम्यान, मुस्कानची बुधवारी टिळक नगर येथील घरात हत्या करण्यात आली होती. ती घरात एकटी असताना इमरानने तिच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. शेजाऱ्यांना तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर त्यांनी धाव घेतली. त्यावेळी मुस्कान गंभीर जखमी अवस्थेत आढळली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.


मुस्कानचा मित्र अमन याने दिलेल्या माहितीनुसार, इमरान त्याच जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होता, जिथे मुस्कान व्यायामासाठी जात होती. तो तिला त्रास देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास केला जात आहे. ( Tilak Nagar Murder)




Comments
Add Comment

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु