Orry broke his silence on dispute : "माझ्यासाठी तो काळ नरकासारखा होता"; ओरीच साराच्या आईसोबत काय वाकड ? सारा सोबतची मैत्रीही तुटली, धक्कादायक खुलासे

मुंबई : सोशल मीडिया स्टार ओरहान अवत्रामणी म्हणजेच सर्वांचा लाडका 'ओरी' (Orry) सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या वर्तुळात आला आहे. ओरीने बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री अमृता सिंग (Amruta Singh) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अमृता सिंग यांच्यामुळे आपल्या आयुष्यात एक असा कठीण काळ आला होता, ज्याने आपल्याला आतून पूर्णपणे हादरवून टाकले होते, असा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे. २०२१ मध्ये घडलेला हा प्रसंग आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट आणि अंधकारमय काळ होता, असे ओरीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले.



"त्या कठीण प्रसंगाने मला मजबूत बनवले"


एका दिलेल्या मुलाखतीत ओरीने अमृता सिंग यांचा उल्लेख 'अमृता अली खान' असा करत त्या प्रसंगाची आठवण करून दिली. ओरी म्हणाला, "२०२१ मध्ये जेव्हा अमृता यांनी मला प्रचंड मानसिक त्रास दिला, तो माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. मी आयुष्यात कधीच इतक्या कठीण आणि वेदनादायी प्रसंगाला सामोरे गेलो नव्हतो. त्या काळात मला अक्षरशः नरकाचा अनुभव आला." पुढे बोलताना ओरीने सांगितले की, जेव्हा तो त्या कठीण काळातून बाहेर पडला, तेव्हा लोकांनी त्याला 'तू यातून अधिक मजबूत होऊन बाहेर पडशील' असे सांगितले होते. आज सोशल मीडियावर लोकांकडून मिळणाऱ्या द्वेषाचा (Hate) सामना करण्याची ताकद त्याला त्याच घटनेमुळे मिळाली आहे, असे सांगत ओरीने एक प्रकारे अमृता सिंग यांचे आभारही मानले.



वादाचे मूळ कारण गुपित; सारा अली खानसोबतची मैत्री संपली


अमृता सिंग यांच्यासोबत नक्की काय वाद झाला होता, याचे स्पष्ट कारण ओरीने अजूनही गुलदस्त्यातच ठेवले आहे. मात्र, या वादामुळे अमृता सिंग यांची मुलगी आणि ओरीची जवळची मैत्रीण असलेली अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिच्यासोबतची त्याची जुनी मैत्री पूर्णपणे संपली. २०२५ मध्ये साराच्या वाढदिवशी ओरीने सोशल मीडियावर तिचे काही अनफिल्टर/न आवडणारे फोटो पोस्ट केले होते, तिथून त्यांच्या मैत्रीत उघडपणे दरी निर्माण झाली. त्यानंतर ओरीने '३ सर्वात वाईट नावे' या शीर्षकाखाली एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये सारा, अमृता आणि पलक या तिन्ही नावांचा उल्लेख होता.



सोशल मीडियावर अनफॉलो अन् वादाची मालिका


या सर्व प्रकारानंतर सारा अली खान आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खान या दोघांनीही ओरीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले. त्यावर शांत न राहता ओरीने सोशल मीडियावर काही गूढ पोस्ट शेअर करत थेट या भावंडांना लक्ष्य केले. एका पोस्टमध्ये त्याने इब्राहिम अली खानला 'सर्वात बेशरम' असेही म्हटले होते. या वादानंतर आता सारा, इब्राहिम किंवा त्यांच्या कुटुंबाशी आपला कोणताही संबंध किंवा संपर्क उरलेला नाही, असे ओरीने शेवटी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :