प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडला. अंतिम फेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत नागपूर निन्जाज (आर्यन गोविंदा पथक) संघाने सलग दुसऱ्या वर्षी जेतेपदावर नाव कोरले.



विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव


विजेते (चॅम्पियन) : नागपूर निन्जाज (आर्यन गोविंदा पथक) – ₹७५ लाख रोख आणि मानाची भव्य ट्रॉफी.


उपविजेते (१st रनर अप) : नाशिक रेंजर्स – ₹५० लाख रोख आणि ट्रॉफी.


तृतीय क्रमांक (२nd रनर अप) : अलिबाग नाईट्स – ₹२५ लाख रोख आणि ट्रॉफी.


अंतिम सामन्यानंतर झालेल्या शानदार बक्षीस वितरण समारंभात प्रो गोविंदाचे ब्रँड ॲम्बेसेडर आणि भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते विजेत्या नागपूर निन्जाज संघाला ७५ लाखांचा धनादेश व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. तर मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उपविजेत्या नाशिक रेंजर्स (५० लाख) आणि तृतीय क्रमांकावरील अलिबाग नाईट्स (२५ लाख) संघांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.


गेल्या वर्षीही चॅम्पियन ठरलेल्या आर्यन गोविंदा पथकाने या वर्षीही आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या आणि शिस्तीच्या जोरावर बाजी मारत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. या यशानंतर क्रीडाप्रेमी आणि गोविंदा पथकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर