Nilesh Rane : 'गरज पडली तर हिंदुत्त्वासाठी कायदाही हातात घेऊ'

मुंबई : परळ-लालबाग परिसरात ईदच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या राड्यात जखमी झालेल्या मराठी तरुणाची आणि त्याच्या कुटुंबीयांची शिवसेना आमदार निलेश राणे यांनी शुक्रवारी भेट घेऊन धीर दिला. यावेळी बोलताना, "आज इथे हिंदू म्हणून माझ्या बांधवांना सपोर्ट करण्यासाठी मी आलो आहे. उद्या जर हिंदुत्त्वासाठी कायदा हातात घ्यावा, लागला तरी आमची तयारी आहे", असा विश्वास त्यांनी परिसरातील नागरिकांना दिला.



ईदच्या मिरवणुकीवेळी बुधवारी (२६ ऑगस्ट) रात्री परळ आणि लालबाग परिसरात दुचाकीस्वारांच्या हॉर्न वाजवण्यावरून आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनावरून दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. तकिया मशीद परिसरात दुचाकीस्वारांच्या वादातून सुरू झालेल्या या बाचाबाचीचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी सुरू असताना घडलेल्या या प्रकारात सागर अनिल देवगडकर या स्थानिक तरुणाच्या डोक्याला लोखंडी सळई लागून गंभीर दुखापत झाली. या झटापटीत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणारे काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते.



या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रेहान मसूद सय्यद, आदिल खान अहमद खान आणि मिराज मोहम्मद फिरोज रईस या तिघांसह इतर अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेनंतर आमदार निलेश राणे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत, हिंदूंवर अन्याय झाल्यास शांत बसणार नाही, असा विश्वास परिसरातील नागरिकांना दिला.




Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण