Crime News : मुंबईत तरुणाला धावत्या लोकलमधून लाथ मारून खाली पाडले; आरोपीला अटक

मुंबई : मुंबईतील धावत्या लोकलमधून तरुणाला लाथ मारून खाली पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकलच्या दरवाजात उभे राहण्यावरून झालेल्या वादातून २४ वर्षीय तौसिफ शेख याला सहप्रवाशाने लाथ मारल्याचे समोर आले आहे. या घटनेत तौसिफ गंभीर जखमी झाला असून रेल्वे पोलिसांनी राहुलकुमार पांडे (३०) याला अटक केली आहे. किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या प्रकारात झाल्याने मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Mumbai Local)


मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजून ४१ मिनिटांनी गोरेगावहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये ही घटना घडली. कांदिवली स्थानकातून राहुलकुमार पांडे लोकलमध्ये चढला होता. त्यावेळी तौसिफसोबत त्याचा वाद सुरू झाला. बोरिवली स्थानकाजवळ तौसिफने राहुलकुमारला लोकलच्या आत सरकण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि काही वेळातच या वादाचे रूपांतर झटापटीत झाले. (Crime News)



लोकल बोरिवली स्थानकातून सुटल्यानंतर दोघांमधील वाद आणखी वाढला. याचदरम्यान राहुलकुमार पांडे याने तौसिफच्या पाठीवर जोरदार लाथ मारली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तौसिफ धावत्या लोकलमधून खाली पडला. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रेल्वे पोलिसांनी तातडीने तौसिफला उपचारासाठी नेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला टाके घालण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तौसिफ नालासोपारा येथे राहत असून कारपेंटर म्हणून काम करतो. (Mumbai Local)


दरम्यान, मुंबई लोकलमधील अशा हिंसक घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. २० ऑगस्ट रोजी वांद्रे-माहीमदरम्यान धावत्या चर्चगेट-बोरिवली लोकलमधून बाहेर ढकलल्याने ६२ वर्षीय दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाला होता. राखीव डब्यातील जागेवरून हा वाद झाला होता. तसेच ८ ऑगस्ट रोजी सीटवरून झालेल्या वादात एका महिलेला हाताने आणि बेल्टने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोहम्मद रिझवान अन्सारी याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे लोकलमधील किरकोळ वाद हिंसक होण्यापूर्वी त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर आहे. (Mumbai Local)

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा