Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालय FDA वर नाराज, MCA च्या बंद आस्थापना पुन्हा सुरू करण्याचे निर्देश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आपली ताठर भूमिका सोडावी, अन्यथा न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करावी लागेल, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी दिला. न्यायालयाच्या आदेशांकडे एफडीए प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या या इशाऱ्यानंतर अखेर एफडीएने नरमाईची भूमिका घेत मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) बजावलेली कामबंद नोटीस मागे घेण्याची तयारी दर्शवली.



प्रभारी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या बहुचर्चित प्रकरणाची सुनावणी झाली. भेसळखोरीविरोधात एफडीएने केलेल्या धाडसी कारवाईचे न्यायालयाने यापूर्वी वेळोवेळी कौतुक केले आहे; मात्र न्यायालयाचे आदेश असतानाही एखाद्या प्रकरणात प्रशासनाने विनाकारण ताठर भूमिका घेणे योग्य नाही, असे खंडपीठाने सुनावले. न्यायालयाच्या आदेशानुसार नव्याने करण्यात आलेल्या तपासणीत एमसीएच्या कॅन्टीनमध्ये ८८ टक्के अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत असल्याचे निष्पन्न झाले. याची दखल घेत न्यायालयाने एमसीएच्या बीकेसी परिसरातील बंद करण्यात आलेल्या पाचही उपाहारगृहांवरील अन्न परवाना निलंबनाची कारवाई रद्द करत संबंधित आस्थापना तत्काळ पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले.



एफडीएच्या अधिकाऱ्यांनी २० ऑगस्ट रोजी बीकेसी येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्लब परिसराची अचानक तपासणी केली होती. यावेळी परमिट रूमसह स्वयंपाकघराची पाहणी करताना काही त्रुटी आढळल्या होत्या. किचनमधील फ्रीजमध्ये बर्फ साचणे, प्रवेशद्वाराजवळील फरशी अस्वच्छ असणे, एफएसएसएआय परवाना दर्शनी भागात न लावणे, तसेच कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता व सॅनिटेशनच्या निकषांचे पूर्ण पालन होत नसल्याचा दावा करत एफडीएने २२ ऑगस्ट रोजी येथील पाच खाद्य आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित केले होते. प्रशासनाने व्यावहारिक दृष्टिकोन न ठेवता कागदी कारवाई केल्याबद्दल उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान नाराजी व्यक्त केली. त्यानंतर एफडीएने संबंधित आस्थापनांना नव्याने कारणे दाखवा नोटीस बजावून रितसर सुनावणीची संधी देण्याचे मान्य केले असून, या घोषणेसह उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली आहे.
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने