Election Commission of India : मतदार यादीतून नाव वगळले का?

येत्या ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी


मुंबई : भारत निवडणूक आयोगाकडून १९ ऑगस्ट २०२६ रोजी मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुधारित वेळापत्रक प्राप्त झाले आहे. त्‍यानुसार, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांतर्गत सर्व विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांच्या सुसुत्रीकरणाच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने २४ ऑगस्ट २०२६ रोजी मान्यता दिली आहे. तसेच, ३१ ऑगस्‍ट २०२६ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.


प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर दावे व हरकती संबंधित विधानसभा मतदारसंघ कार्यालयात स्विकारण्यात येतील. विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालयाच्या पत्त्याची यादी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mcgm.gov.in >> नवीन >> विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम - २०२६ >> दावे व हरकती >> विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालय पत्त्याची यादी या पथदर्शकान्वये प्रसिध्द करण्यात आली आहे.



३१ ऑगस्‍ट २०२६ ते २९ ऑक्‍टोबर २०२६ या कालावधीत Unmapped मतदार, Anomalies असलेले मतदार व ज्यांनी दावे व हरकती दाखल केले आहेत अशा मतदारांना संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामार्फत नोटीस बजावून त्याअनुषंगाने सुनावणीद्वारे दावे व हरकती निकाली काढण्यात येतील.तसेच, ४ नोव्‍हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी केली जाणार आहे.


१ ऑक्‍टोबर २०२६ रोजी ज्यांचा वयाची १८ वर्ष पूर्ण होणार आहेत असे मतदार दिनांक ३१ ऑगस्‍ट २०२६ ते ३० सप्‍टेंबर २०२६ या कालावधीत नमुना ६ (नवीन मतदारांसाठीचा अर्जाचा नमुना) भरुन व आवश्यक ती कागदपत्रे सादर करुन मतदार यादीत नावे नोंदवू शकतात.


ज्या मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत समाविष्ट नाहीत अथवा मतदार यादीतून वगळली गेली आहेत असे मतदार ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना ६ (नवीन मतदारांसाठीचा अर्जाचा नमुना) भरून व आवश्यक ती कागदपत्रे सादर करुन मतदार यादीत नावे नोंदवू शकतात,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून