Jalgaon News : ...'जो दाग रह गये उन्हे मिटाके आऊंगा' ! 'सगळं सांभाळून घे दीदी, मी जातो' भावनिक मेसेज अन् रक्षाबंधनाच्या दिवशीच तरुणाचं टोकाचं पाऊल

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. सर्वत्र रक्षाबांधन या भाऊ- बहिणीच्या सणाचा उत्साह असताना जळगावमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. 'सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको, मी जातो' असा भावनिक मेसेज सोशल मीडियावर बहिणीला पाठवून एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. रोहित साहेबराव धनगर असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. (Jalgaon Crime News)



राखी बांधून आला अन्...


रोहित धनगर हा अकरावीत कला शाखेत शिक्षण घेत होता. शुक्रवारी रक्षाबंधनाचा मोठा उत्साह होता. हाच सण साजरा करण्यासाठी रोहित आपल्या वडिलांसोबत आत्याच्या घरी गेला होता. तिथे मोठ्या उत्साहात बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर तो वडिलांची दुचाकी घेऊन जुना आसोदा रोड परिसरातील स्वतःच्या घरी परतला. मात्र घरी आल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर (Instagram) बहिणीसोबतचा फोटो अपलोड करत 'हॅपी रक्षा बंधन ताई... सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको, मी जातो' असा भावनिक संदेश लिहिला. (Jalgaon Crime News)



...जो दाग रह गये उन्हे मिटाके आऊंगा


महत्त्वाचे म्हणजे रोहितने जीवनयात्रा संपवण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर आणखी एक भावनिक स्टेटस ठेवले होते. त्यात त्याने लिहिले होते की, "अगली बार आऊंगा तो सबका मनपसंद बनके आऊंगा, जो दाग रह गये उन्हे मिटाके आऊंगा, ना मेरी आखे नम होगी ना दिल मे कोई गम लेके आऊंगा! शुक्रिया..." याशिवाय, ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावल्याचे सांगणारा एक व्हिडिओ त्याने आपल्या मित्राला पाठवल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात रोहितचे स्टेटस आणि हे मेसेज पहिल्यांनंतर त्याच्या मित्रांच्या पायाखालची वाळू सरकली.(Jalgaon Crime News)



मित्रांनी धाव घेतली, पण उशीर झाला होता


रोहितच्या मित्रांनी तातडीने त्याच्या घराच्या दिशेने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. रोहितने घरात गळफास घेतला होता. मित्रांनी आणि कुटुंबीयांनी त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात (Shanipeth Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रक्षाबंधनासारख्या आनंदाच्या दिवशीच ऐन उमेदीच्या मुलाने जगाचा निरोप घेतल्याने कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे तर घडलेल्या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा