Chiplun ST Bus Accident : चिपळूणमध्ये मोठा अपघात; दोन एसटी बसेसची धडक, ३० ते ४० प्रवासी जखमी

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणजवळ दोन एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात ३० ते ४० प्रवासी जखमी झाले आहे. परंतु या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमी प्रवाशांना तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे.


समोर आलेल्या माहितीच्या आधारे, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून आंबडस परिसरातील चिरणी फाट्याजवळ दोन एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात सुमारे ३० ते ४० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.



चिपळूणहून चोरवणेच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि कासईहून चिपळूणकडे येणारी एसटी बस खांदाट गवळवाडी परिसरात एका वळणावर समोरासमोर धडकल्या. या भीषण अपघातात अनेक प्रवाशांना दुखापत झाली असून काही प्रवाशांना गंभीर दुखापतही झाल्याची माहिती आहे. तीव्र उतार आणि धोकादायक वळणावर बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला असे प्राथमिक माहितीच्या आधारे सांगण्यात येत आहे. दोन्ही बसची धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये समोरील भाग चक्काचूर झाला असून या धडकेत सुमारे ३० ते ४० प्रवासी जखमी झाले आहे.


स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि प्रवाशांना बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य पूर्ण करण्यात आलं असून, पोलीस अपघाताच्या कारणांचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण