मुंबई : सकाळी उठल्या उठल्या स्वयंपाकघरात जाऊन पिण्यासाठी तांब्या भरणे असो किंवा मुलांच्या शाळेच्या आणि ऑफिसच्या बाटल्या भरणे असो, आपण थेट वॉटर प्युरिफायरचा म्हणजेच (RO) नळ चालू करतो आणि पाण्याची टाकी रिकामी करायला लागतो. पण असं न करता सकाळी उठल्यावर प्युरिफायरच्या टाकीतलं पाणी काढून RO पूर्ण रिकामा करावा, असं करण्यामागचं नेमकं कारण काय आहे? हे सविस्तर समजून घेऊया. (Water Purifier)
रात्री झोपण्यापूर्वी प्युरिफायरची टाकी पूर्ण भरलेली असते. रात्रभर घरातील सर्वजण झोपलेले असताना हे पाणी बंदिस्त टाकीत आणि पाईप्समध्ये तासनतास एकाच जागी साठवून ठेवलेलं राहतं. कोणत्याही नैसर्गिक प्रकाशाविना किंवा प्रवाहाविना प्लास्टिकच्या बंद पेटीत पाणी साचून राहिल्यामुळं त्याची मूळ ताजी गुणवत्ता आणि ऑक्सिजनचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागतं. (Water Purifier)
महाराष्ट्रातील शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी असून, पारंपारिक कागदी रेशन कार्डऐवजी आता QR कोड असलेले अत्याधुनिक स्मार्ट रेशन कार्ड ...
जेव्हा पाणी अनेक तास प्लास्टिकच्या टाकीत राहतं, तेव्हा टाकीच्या आतील पृष्ठभागावर 'बायोफिल्म' (सूक्ष्म जिवाणू आणि शेवाळासारखा सूक्ष्म थर) तयार होण्यास पोषक वातावरण मिळतं. दिवसभर पाणी सतत वापरलं जात असल्यानं हा थर जाणवत नाही, पण रात्रभर साचून राहिलेल्या पाण्यात हे जिवाणू वेगानं वाढू लागतात. अनेक तास फूड-ग्रेड प्लास्टिकच्या टाकीत पाणी राहिल्यामुळं सकाळी त्या पाण्याला हलका प्लास्टिकसारखा पाण्याचा वास येतो. या शिळ्या पाण्याच्या पहिल्या घोटामुळे पचनाच्या तक्रारी, ॲसिडिटी किंवा घशात खवखव जाणवण्याचा धोका निर्माण होतो. (Water Purifier)
पाणी रात्रभर स्थिर राहिल्यानं त्यातील सूक्ष्म क्षार आणि बारीक घटक टाकीच्या अगदी तळाशी जाऊन बसतात. सकाळी नळ चालू करताच टाकीच्या तळाशी साचलेला हा जड पाण्याचा थर थेट तुमच्या पहिल्या ग्लासात किंवा पाण्याच्या बाटलीत उतरतो. जो साहजिकच आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतो.
त्यामुळे सकाळी उठल्यावर वॉटर प्युरिफायरमधील रात्रभर साठलेलं पाणी काढून टाकी पूर्णपणे रिकामी करणं आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. टाकीतील रात्रभर साचलेला प्लास्टिकचा वास आणि सूक्ष्म जिवाणू बाहेर पडतात मशीन नव्यानं सुरू होऊन संपूर्ण दिवसासाठी तुमच्या कुटुंबाला 100% ताजं, शुद्ध आणि नव्यानं फिल्टर झालेलं पाणी मिळतं. (Water Purifier)
सकाळी प्युरिफायर रिकामं करताना बाहेर पडणारं पाणी साधं पिण्यायोग्य नसलं, तरी ते पूर्णपणे स्वच्छ असतं. त्यामुळं ते गटारात फेकून न देता घरातील झाडांना घालता येऊ शकतं. लादी पुसण्यासाठी किंवा भांडी विसळण्यासाठीही या पाण्याचा वापर करता येतो.






