Nashik Crime News : मुलाला चारचाकी चालवण्यास देणे वडिलांना पडले महागात, गुन्हा दाखल; पण कारण काय ?

Nashik Crime News : तुम्ही सुद्धा तुमच्या अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यास देत असाल तर थांबा असं करू नका नाहीतर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. कारण नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या (Deolali Camp Police Station) हद्दीत देखील १५ वर्षांच्या मुलाला चारचाकी (कार) चालवण्यास देणे वडिलांना महागात पडले आहे. निष्काळजीपणे कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलासह, त्याला गाडी (Car) चालवण्यास देणाऱ्या त्याच्या वडिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.



नेमकं प्रकरण काय ?


२६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ​देवळाली कॅम्प येथील गरीबदास मिठाईवाला दुकानाजव पंधरा वर्षीय मुलगा मुलगा व्हेंटो कार सार्वजनिक रस्त्यावर वेगाने व निष्काळजीपणे चालवत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. बरं हा चालक मुलगा अल्पवयीन होत, त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला दुखापत होण्याची शक्यता निर्माण होती. हीच बाब लक्षात घेऊन हवालदार सचिन बोरसे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. यावरून मुलाचे वडील संशयित वसीम युसूफ शेख (वय ४३, रा. हाऊसन राेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



गर्दीचा फायदा घेत दोन महिलांचे मंगळसूत्र चोरी


दरम्यान दुसरीकडे निमाणी बस स्थानकावरून (Nimani Bus Stand) बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत दोन महिलांच्या गळ्यातील तब्बल ६० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगळसूत्रे शिताफीने लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण