Saturday, August 29, 2026

Swine Flu : महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटकात 'स्वाईन फ्लू'च्या रुग्णांच्या संख्येत वाढ

Swine Flu : महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटकात 'स्वाईन फ्लू'च्या रुग्णांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि चंदीगडसह अनेक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एच१एन१ आणि इन्फ्लूएंझाचे रुग्ण वाढले आहेत. आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, काही राज्यांमध्ये यंदा नोंदवलेल्या रुग्णांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत स्वाइन फ्लूचा संसर्ग सातत्याने वाढत असून, २७ ऑगस्टपर्यंत एच१एन१चे २,७२९ रुग्ण आढळले आहेत. केवळ २७ ऑगस्ट रोजी १२५ नवीन रुग्णांची नोंद झाली. इन्फ्लूएंझा ‘ए’ आणि ‘बी’चे रुग्ण धरून दिल्लीत एकूण बाधितांची संख्या ३,७३६ झाली आहे. यातील सुमारे तीन-चतुर्थांश रुग्ण एच१एन१चे आहेत. (Swine Flu)

https://www.prahaar.in/2026/08/29/general-zhao-zongqi-who-ordered-operation-galwan-removed-from-his-post/

कर्नाटकात एच१एन१ आणि इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. २४ ऑगस्टपर्यंत राज्यात प्रयोगशाळेतून निदान झालेले ४,४२८ रुग्ण नोंदवले गेले आहेत. कर्नाटकात इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने वर्षातून दोनदा वाढतो. जानेवारी ते मार्च आणि जुलै ते सप्टेंबर या कालावधीत रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातही परिस्थिती चिंताजनक आहे. २१ ऑगस्टपर्यंत राज्यात एच१एन१चे १,१०९ रुग्ण आढळले आहेत. ही संख्या संपूर्ण २०२५ मध्ये नोंदलेल्या ९४२ रुग्णांपेक्षा अधिक आहे. राज्यातील एकूण बाधितांपैकी सुमारे ६५ टक्के रुग्ण मुंबई आणि पुणे शहरांत आढळले आहेत. पावसाळ्यात इन्फ्लूएंझाच्या रुग्णसंख्येत वाढ होणे सामान्य असले, तरी यंदाची रुग्णसंख्या मागील वर्षांच्या तुलनेत अधिक असल्याचे साथरोग तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) देशात कोणत्याही नवीन स्ट्रेनची ओळख पटलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या आढळणारा इन्फ्लूएंझा ए (एच१एन१) pdm09 हा विषाणू २०२५ पासून सक्रिय आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Swine Flu)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >