Ritu Tawde : महापौरांच्या गाडीतून त्या नवजात बाळाचा झाला गृहप्रवेश

बाळंतिणीच्या मदतीला धावून गेल्या महापौर


मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रसारमाध्यमातून विविध प्रकारे बदनामी होत असतानाच त्यांच्या माणुसकीचे दर्शन गुरुवारी घडले. प्रसूत झालेली महिला रुग्णालयातून डिस्चार्ज घेवून बाळासह घरी निघालेली असतानाच त्यांना रिक्षा उपलब्ध होत नव्हती.पण त्याच वेळी त्या माता बाळाच्या मदतीला महापौर जावून गेल्या. महापौर रितू तावडे यांनी त्या बाळंतिणीला आणि तिच्या कन्येला स्वतःच्या महापौर वाहनात बसवले आणि सुरक्षितपणे खैरानी मार्ग (कुर्ला) येथे घरी पोहोचवले. वाहनात स्वतः नवजात कन्येला कुशीत घेऊन घरी जाताना तिला आईकडे सोपवले आणि भरभरून शुभेच्छा दिल्या, मातृ भावनेने त्यांना आशीर्वादही दिला. त्यामुळे त्या नवजात कन्येचा गृहप्रवेश हा थेट मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या वाहनातून झाल्याने एकप्रकारे त्यांच्या कुटुंबांच्या आणि आसपासच्या शेजाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते.


पावसाच्या सरी कोसळत असताना, सोबतीला जोरदार वारा वाहत असताना, घाटकोपरच्या संत मुक्ताबाई रुग्णालयाबाहेर एक आई आपल्या नवजात कन्येला घेऊन उभी होती. घरी जाण्याची घाई, हातात बाळ आणि तासभर वाट पाहूनही त्या दाम्पत्याला रिक्षा मात्र मिळत नव्हती. अशा वेळी, रुग्णालयातील पाहणी दौरा आटोपून बाहेर पडताना, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी त्या नवजात कन्येचा रडण्याचा आवाज ऐकला. तिच्या आईच्या डोळ्यांतली काळजी पाहून महापौरांनी तिची विचारपूस केली. प्रसंग लक्षात येताच, क्षणाचाही विलंब न लावता रितू तावडे यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.



एक महिला म्हणून एका आईची वेदना त्यांनी तात्काळ ओळखली. महापौर रितू तावडे यांनी त्या बाळंतिणीला आणि तिच्या कन्येला स्वतःच्या महापौर वाहनात बसवले आणि सुरक्षितपणे खैरानी मार्ग (कुर्ला) येथे घरी पोहोचवले. वाहनात स्वतः नवजात कन्येला कुशीत घेऊन घरी जाताना तिला आईकडे सोपवले आणि भरभरून शुभेच्छा दिल्या, मातृ भावनेने आशीर्वाद दिला.


जन्म झाल्यानंतर रुग्णालयातून पहिल्यांदाच घराकडे निघालेल्या त्या चिमुकलीचा हा पहिला प्रवास थेट महापौरांच्या वाहनातून झाला, हा क्षण त्या बाळंतिणीसाठी, तिच्या कुटुंबासाठी भावनिक आणि संस्मरणीय ठरला. असा योग अत्यंत दुर्मीळ असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवली.


महापौरांनी त्या बाळाला प्रेमाने भेट देत तिचे स्वागत केले. तर आईला शुभेच्छा देत तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवले. या कृतीतून ‘कन्या हीच शक्ती’ आणि ‘माणुसकी हाच धर्म’ हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला. त्याचप्रमाणे, या प्रसंगाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, मोठेपण पदात नसते, ते मनात असते. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्या कृतीतून ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म