UGC NET 2026 Result : यूजीसी नेट जून २०२६ चा निकाल जाहीर; स्कोअरकार्ड, कट-ऑफ आणि मेरिट लिस्ट अशी तपासा

नवी दिल्ली : UGC NET जून २०२६ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTAने शुक्रवारी रात्री ८४ विषयांचे निकाल जाहीर केले. उमेदवारांना आपला निकाल आणि स्कोअरकार्ड अधिकृत वेबसाइटवर पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे. उमेदवारांना ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून स्कोअरकार्ड डाउनलोड आणि प्रिंट करता येईल. मात्र, इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांची परीक्षा तांत्रिक कारणांमुळे पुन्हा घेतली जाणार असल्याने या विषयांच्या उमेदवारांचा निकाल सध्या जाहीर करण्यात आलेला नाही. (UGC NET 2026 Result)



UGC NET स्कोअरकार्ड कसं तपासायचं?


उमेदवारांनी स्कोअरकार्ड तपासण्यासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण करावी :


- सर्वप्रथम ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवरील UGC NET June 2026 Score Card लिंकवर क्लिक करा.
- आपला Application Number आणि Password टाका.
- लॉगिन केल्यानंतर स्क्रीनवर तुमचा स्कोअरकार्ड आणि विषयानुसार मिळालेले गुण दिसतील.
- स्कोअरकार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट भविष्यासाठी जतन करून ठेवा. (UGC NET 2026 Result)



‘या’ तीन विषयांचा निकाल अद्याप नाही :


NTAने दिलेल्या माहितीनुसार इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांचे निकाल सध्या रोखण्यात आले आहेत. तांत्रिक कारणांमुळे या विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तीन विषयांची फेरपरीक्षा ९ आणि १० सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी सध्या स्कोअरकार्ड पाहण्याचा प्रयत्न केल्यास Invalid Application Number or Password असा एरर मेसेज दिसू शकतो. या उमेदवारांचा निकाल फेरपरीक्षा पूर्ण झाल्यानंतर जाहीर केला जाणार आहे.



असिस्टंट प्रोफेसर आणि JRFसाठी पुढे काय?


UGC NET परीक्षेच्या माध्यमातून विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्रता निश्चित केली जाते. याशिवाय पात्र आणि उच्च क्रमांक मिळवणाऱ्या उमेदवारांना Junior Research Fellowship (JRF) मिळण्याची संधी असते. ८४ विषयांची अंतिम उत्तरतालिका यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता लवकरच प्रवर्गनिहाय कट-ऑफ मार्क्स आणि ई-सर्टिफिकेट जारी होण्याची शक्यता आहे.



अंतिम उत्तरतालिकाही झाली होती जाहीर :


दरम्यान, NTAने शुक्रवारीच UGC NET जून २०२६ ची Final Answer Key जाहीर केली होती. ८४ विषयांसाठी ही अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारांना अधिकृत उत्तरतालिकेच्या आधारे त्यांनी दिलेली उत्तरं तपासून संभाव्य गुणांचा अंदाज घेता येतो.

Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?