Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, बहिणीच्या घरी रक्षाबंधनानिमित्त आगमन; विमानतळावर एकनाथ शिंदेंसोबत १० मिनिटे चर्चा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मुंबई दौऱ्यावर होते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विमानतळावर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात १० मिनिटे स्वतंत्र चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.



गुजरात दौऱ्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अमित शाह मुंबई विमानतळावर दाखल झाले. ताडदेव येथे बहिणीच्या घरी जाऊन त्यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. विमानतळावर स्वागतादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचे पर्व साजरे केले. विमानतळावरील स्वागतानंतर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेने सर्वांचे लक्ष वेधले. महायुती सरकारमधील काही मंत्र्यांच्या नाराजीबाबत आणि अन्य राजकीय घडामोडींवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर चिंता करण्याचे कारण नाही, असे आश्वासन गृहमंत्री शाह यांनी दिल्याचे कळते. कौटुंबिक कार्यक्रम आटोपून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शाह यांनी मुंबईतून पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने