Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास करण्याचे काम सुरु होणार असल्यामुळे आता नवी मुंबईतील नव्या विमातळावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. यामुळे आता दोन्ही विमानतळांवरील विमान वाहतुकीचे नियोजन बदलणार आहे. (Mumbai Airport)


मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस १ च्या उत्तर भागाचा म्हणजेच T-1B चा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्याच कामासाठी हा भाग १५ जानेवारीपासून बंद केला जाईल त्यामुळे सध्या या टर्मिनलवरुन होणारी साधारण ५० लाख प्रवाशांची देशांतर्गत वाहतूक ही टर्मिनस २ वर हलवण्यात येईल. मात्र, टर्मिनल २ चा सध्या मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापर केला जाणार आहे, त्यामुळे देशांतर्गत विमानांसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करुन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांची काही क्षमता ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात येणार आहे. (Mumbai Airport)


अहवालानुसार, १ ऑक्टोबरपासून मुंबई विमानतळावरील ५० लाख आंतरराष्ट्रीय प्रवाशांची वार्षिक क्षमता ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळविण्यात येणार आहे. त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीला मोठी चालना ही मिळेल. (Mumbai Airport)



दरम्यान, नवी मुंबई विमानतळावर नुकतेच नॅशनल एअरलाइन्सचे मोठे बोइंग ७४७ हे फ्रेटर मालवाहू विमान दाखल झाले होते. त्याचबरोबर एअरबस ए३३० सारखे मोठे वाइड-बॉडी विमानही येथे आले. त्यामुळे भविष्यात नवी मुंबई विमानतळावर प्रवासी सेवेसोबतच मोठ्या प्रमाणात कार्गो अर्थात मालवाहतूकही वाढण्याची शक्यता आहे. (Mumbai Airport)

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा