Sunday, August 30, 2026

Raosaheb Patwardhan Garden Development : वांद्रे पश्चिम येथील रावसाहेब पटवर्धन गार्डनचा होणार विकास

Raosaheb Patwardhan Garden Development : वांद्रे पश्चिम येथील रावसाहेब पटवर्धन गार्डनचा होणार विकास

- तब्बल पाच कोटींचा केला जाणार खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

वांद्रे पश्चिम येथील राबसाहेब पटवर्धन उद्यानाचा आता विकास होणार असून यातील आर सी सी पूलाचे बांधकाम पाडले जाणार आहे. तर उर्वरीत सर्व वास्तूंची दुरुस्ती केली जाणार आहे. या सर्व नुतनीकरणाच्या कामांवर ५.१० कोटी रुपयंचा खर्च केला जाणार आहे. (Raosaheb Patwardhan Garden Development)

https://www.prahaar.in/2026/08/30/maharashtra-weather-alert-rain-to-take-a-break-by-the-end-of-august-however-heavy-rainfall-expected-in-vidarbha-here-is-the-weather-forecast-for-the-state-including-konkan/

मुंबई महानगरपालिकेच्या "एच / पश्चिम 'विभागातील वांद्रे येथील रोड नंबर ३२ वरील रावसाहेब पटवर्धन उद्यानाच्या विकासाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या विकास कामांतर्गत मुख्य प्रवेशद्वार तयार करणे, सुरक्षा खोलीची दुरूस्ती करणे, अस्तित्वात असलेला जुन्या मोडकळीस आणलेल्या आर.सी.सी पूलाचे बांधकाम पाडणे, आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंतीची दुरूस्ती करणे, आवश्यक असेल तिथे ग्रील बदलणे, बैठक व्यवस्थेवर फेरारी रूफ बसविणे, योगा शेडची दुरूस्ती करणे, कॉबल पदपथ तयार करणे, अस्तित्वात असलेल्या पदपथाची दुरूस्ती करणे, शौचालयाची दुरूस्ती करणे, मड पाथवेची दुरूस्ती करणे, पाय-यांची दुरूस्ती करणे, लहान मुलांच्या खेळाचे साहित्य बसविणे, खुल्या व्यायामाची साहित्य बसविणे, कचरा पेटी, माहिती फलक, बेंचेस बसविणे, विद्युतीकरणाची कामे तसेच हिरवळीची कामांचा समावेश आहे. (Raosaheb Patwardhan Garden Development)

https://www.prahaar.in/2026/08/30/heart-wrenching-how-a-pregnant-girlfriend-was-eliminated-one-plot-by-the-boyfriend-and-it-was-all-over-police-action-causes-a-stir/

या कामांसाठी महापालिकेच्यावतीने मागवलेल्या निविदेत एच अॅन्ड एच असोशिएटस या कंपनीची निवड करण्यात आली असून या उद्यानाच्या विकासकामांवर विविध करांसह ५.१० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. (Raosaheb Patwardhan Garden Development)

या उद्यानाच्या जागेवर महापालिकेने सर्वप्रथम भूमिगत वाहनतळाचे काम प्रस्तावित केले होते. याबाबतचा तांत्रिक सल्लागार नेमून याचा आराखडाही बनवला होता. परंतु येथील स्थानिकांच्या विरोधामुळे अखेर येथील भूमिगत वाहनतळाचा प्रस्ताव गुंडाळण्यात आला होता. (Raosaheb Patwardhan Garden Development)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >