JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन


मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथोरिटीने (जेएनपीए) जागतिक पातळीवर मोठी मजल मारली आहे. 'अल्फालाइनर'च्या २०२६ च्या पहिल्या सहामाहीतील कंटेनर बंदर कामगिरी अहवालानुसार, जेएनपीएने २८ व्या स्थानावरून २१ व्या स्थानी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे, जागतिक पातळीवरील टॉप ३० बंदरांमध्ये सर्वाधिक १३.६ टक्के वार्षिक वाढ नोंदवत जेएनपीए हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर ठरले आहे. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रशासनाचे व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. (JNPA)


अल्फालाइनरच्या अहवालानुसार, जेएनपीएने २०२६ च्या पहिल्या सहामाहीत ४४ लाख २ हजार ९०७ टीईयू (ट्वेंटी-फूट इक्विव्हलेंट युनिट्स) कंटेनरची विक्रमी हाताळणी केली. मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा ३८ लाख ७४ हजार ३९४ टीईयू इतका होता. सात स्थानांची ही लक्षणीय भरारी बंदराची वाढलेली कार्यक्षमता, मालाची जलद वाहतूक, जहाजांची सुधारित हाताळणी आणि मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटीच्या बळावर शक्य झाली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक व्यापारात अनेक अडथळे निर्माण झाले होते. या जागतिक संकट काळातही जेएनपीएने मालाची सतत आवक-जावक सुरू ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवल्या. अतिरिक्त ऑपरेशनल ताण यशस्वीपणे हाताळत भारताच्या आयात-निर्यात व्यापाराची सातत्यपूर्ण वाटचाल सुरू ठेवण्यात बंदराने महत्त्वाची भूमिका बजावली. जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल यांनी या यशाचे श्रेय बंदरातील सर्व टर्मिनल ऑपरेटर, भागधारक आणि बंदर समुदायाच्या एकत्रित परिश्रमाला दिले असून, भविष्यात याहून अधिक उच्च मानांकनापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. (JNPA)


'अल्फालाइनर'च्या या मानांकनात चीनचे शांघाय बंदर जगात प्रथम स्थानी कायम राहिले असून, त्यांनी पहिल्या सहामाहीत २८ कोटी ७० लाख टीईयू हाताळले आहेत. त्यानंतर निंगबो-झोउशान आणि सिंगापूर बंदराचा क्रमांक लागतो. दरम्यान, भारताच्या अन्य प्रमुख बंदरांमध्ये मुंद्रा बंदर ४१ लाख टीईयू सह २६ व्या स्थानावर कायम आहे. सध्या जेएनपीए ५ कंटेनर टर्मिनल्स, जनरल कार्गोसाठी बर्थ, लिक्विड कार्गो टर्मिनल्स चालवत आहे. २७७ हेक्टरवर पसरलेल्या या बंदरात निर्यात-भिमुख उद्योगांना प्रोत्साहन देणारे मल्टि-प्रॉडक्ट स्पेशल इकॉनॉमिक झोन (सेझ) देखील कार्यरत आहे. याशिवाय, वाढवण बंदर हे ग्रीनफिल्ड बंदर म्हणून विकसित करण्याचे कामही वेगात सुरू आहे. (JNPA)



भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याची साक्ष - नितेश राणे


या दैदिप्यमान यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, जगभरातील प्रमुख कंटेनर बंदरांच्या क्रमवारीत उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) बंदराने २१वे स्थान पटकावले आहे, ही कामगिरी भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याची आणि जागतिक व्यापार क्षेत्रातील भक्कम होत चाललेल्या स्थानाची साक्ष देणारी आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, कार्यक्षम बंदर व्यवस्थापन आणि वाढत्या व्यापारामुळे भारतीय सागरी क्षेत्राची जागतिक पातळीवर नवी ओळख निर्माण होत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. (JNPA)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने