Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी


मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या जुन्या नारळाच्या झाडांवरून नारळ पडून पादचारी तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर यांनी केली आहे.


सार्वजनिक रस्ते, उद्याने तसेच अधिक वर्दळीच्या ठिकाणी नारळाच्या झाडांना संरक्षण करणाऱ्या जाळ्या अर्थात ‘फॉल प्रोटेक्शन नेट’बसविण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे. या मागणीचे पत्र भिडे यांच्यासह महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनाही देण्यात आले आहे.



कुलाबा परिसरात मोठ्या संख्येने जुनी नारळाची झाडे असून, या झाडांवरून नारळ किंवा फळे अचानक खाली पडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे पादचाऱ्यांना दुखापत होण्याबरोबरच रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर अशा घटना टाळण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.


कुलाब्यातील कुसरो बाग परिसरात रहिवाशांनी स्वतःच्या पुढाकारातून नारळाच्या झाडांना संरक्षण जाळ्या बसविल्या आहेत. या उपायामुळे झाडांवरून पडणारे नारळ थेट वाहनांवर किंवा पादचारी मार्गावर पडण्याचा धोका कमी झाल्याचे नार्वेकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. याच धर्तीवर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नारळाच्या झाडांचे महापालिकेने सर्वेक्षण करावे. त्यानंतर रस्ते, उद्याने आणि अधिक वर्दळीच्या परिसरातील धोकादायक ठरू शकणाऱ्या नारळाच्या झाडांवर मजबूत नायलॉन संरक्षण जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही उपाययोजना तुलनेने सोपी आणि कमी खर्चाची असून, त्यातून अपघात टाळण्यासह नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण होऊ शकते, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून