Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी झटत असताना भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपला जास्तीतजास्त वेळ पक्षकार्याला देत क्रियाशीलता दाखवावी, असे आवाहन भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. पुणे येथे सोमवारी गणेश कला क्रीडा मंडळात आयोजित करण्यात आलेल्या भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी चव्हाण बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील पक्षाचे सर्व मंत्री, पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, राज्यभरातील ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.


उद्घाटनपर भाषणात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, भाजपाने राज्यभरात कार्यकर्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. राज्य आणि केंद्र सरकारच्या उपलब्धी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नव्याने काही वक्ते तयार करता येतील का हे पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते खंबीरपणे मागील निवडणुका लढल्याने भाजपाला राज्यभरात घवघवीत यश मिळाले. त्यामुळे राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींपैकी ८ ते १० हजार ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचे सरपंच आहेत. एवढी मोठी ताकद आणि क्षमता राष्ट्रीयत्वाचा धागा पकडून चालणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आहे.



येत्या काळात राज्यातील युवकांना नशेपासून मुक्त करण्यासाठी या बैठकीच्या निमित्ताने पाऊल उचलले तर महाराष्ट्र भाजपा कार्यकर्त्यांना कायमस्वरूपी लक्षात ठेवेल. राज्यातील १ लाख ५६ हजार बूथवर कार्यकर्ते तयार व्हायला हवेत आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्यावर कोणती ना कोणती जबाबदारी द्यायला हवी. आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद, महापालिका, ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य अशा पदाधिकाऱ्यांपासून पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाच्या सर्व कामात सहभागी सहभागी असला पाहिजे, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.


दीप प्रज्वलनानंतर भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष धीरज घाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांचे स्वागत केले तर प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात