Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील अनेक शाळांनी 31 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना शाळेत न बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. काही शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्गांऐवजी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले जाणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी नागपूरमधील डझनहून अधिक शाळांसह काही सरकारी संस्थांना धमकीचे ईमेल प्राप्त झाले होते. 31 ऑगस्ट रोजी शाळांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी या ईमेलमध्ये देण्यात आली होती. ईमेल मिळाल्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने पोलिसांना माहिती दिली.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम सुरू केली. 600 हून अधिक पोलीस कर्मचारी, बॉम्ब शोधक पथके आणि श्वान पथकांच्या मदतीने विविध शाळा आणि परिसराची तपासणी करण्यात आली. मात्र, तपासणीदरम्यान कोणतेही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही.



पोलिसांनी सुरुवातीला ही धमकी अफवा असल्याचे सांगितले होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांनी कोणताही धोका पत्करण्याचे टाळले आहे. त्यामुळे अनेक शाळांनी 31 ऑगस्टला शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काही शाळांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन वर्ग घेण्याची तयारी केली आहे.


दरम्यान, या प्रकरणी सायबर सेलने गुन्हा दाखल केला असून धमकीचे ईमेल नेमके कोणी पाठवले, याचा तपास सुरू आहे. ईमेलचा स्रोत आणि पाठवणाऱ्याची ओळख शोधण्यासाठी पोलीस तांत्रिक तपास करत आहेत. यासाठी ईमेल सेवा पुरवठादाराशीही संपर्क साधला जात आहे.


सुरक्षेच्या कारणास्तव शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी पालकांनी घाबरून न जाता शाळा प्रशासन आणि पोलिसांकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी