LPG Price Hike : सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात वाढ

मुंबई : सप्टेंबर महिन्याची सुरुवातच महागाईच्या झटक्याने झाली आहे. दूध आणि साखरेच्या दरानंतर आता व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. 1 सप्टेंबरपासून 19 किलोच्या कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात 9.50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिकांना वाढीव दराचा सामना करावा लागणार आहे.


नवीन दरानुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोचा कमर्शियल LPG सिलिंडर आता 2,747.50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत याच सिलिंडरसाठी 2,701 रुपये मोजावे लागतील. चेन्नईमध्ये सिलिंडरचा दर 2,916.50 रुपये झाला आहे. तर लेहमध्ये कमर्शियल LPG सिलिंडर सर्वाधिक महाग असून त्याची किंमत 3,385.50 रुपये झाली आहे.



दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मात्र यावेळी दिलासा मिळाला आहे. 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत घरगुती सिलिंडर 941.50 रुपये, तर दिल्लीत 942 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


याशिवाय 5 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही 2 रुपयांची वाढ झाली आहे. या सिलिंडरची किंमत आता 764 रुपये झाली आहे.


गेल्या काही वर्षांतील 1 सप्टेंबरच्या दरांचा विचार केला तर कमर्शियल LPG सिलिंडरच्या किमतीत अनेकदा वाढ आणि कपात झाली आहे. 2017 मध्ये 115 रुपयांची वाढ झाली होती. तर 2023 मध्ये 157.50 रुपयांची मोठी कपात करण्यात आली होती. यंदा मात्र 9.50 रुपयांची वाढ झाली आहे.


कमर्शियल गॅसच्या दरवाढीचा परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या व्यवसायावर होण्याची शक्यता आहे. गॅसचा खर्च वाढल्याने आगामी काळात बाहेरचे खाद्यपदार्थ आणि हॉटेलमधील काही पदार्थांच्या किमतीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

Comments
Add Comment

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

Nashik News : सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन , नाशिकमध्ये खळबळ

Malegaon News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील सहकार निबंधक कार्यालयातील

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Gold Silver Rate Today : सोनं-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ! ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा

Gold Silver Rate Today : सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या