Tuesday, September 1, 2026

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांमध्येही पाहायला मिळत आहे. पुण्यातील गणेशोत्सवात सहभागी होता येत नसल्याने भारतीय लष्करातील विविध तुकड्यांच्या जवानांसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्ती देण्यात आल्या आहेत. या मूर्ती कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह विविध सीमावर्ती भागात रवाना करण्यात आल्या आहेत. (Dagdusheth Halwai Ganpati)

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या पुढाकारातून भारतीय लष्करातील २४, ५, १९ आणि १ मराठा लाइट इन्फन्ट्री युनिटच्या जवानांना या मूर्ती देण्यात आल्या. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, तुषार रायकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सीमेवर अहोरात्र देशसेवेत कार्यरत असल्यामुळे जवानांना पुण्यातील गणेशोत्सवात प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही. त्यामुळे मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या जवानांनी सीमावर्ती भागात दगडूशेठ गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार ट्रस्टने सैनिकांच्या भावनेचा सन्मान करत श्रींच्या हुबेहूब दोन फुटी प्रतिकात्मक मूर्ती उपलब्ध करून दिल्या. सन २०११ पासून मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्ट यांच्यात स्नेहाचे संबंध आहेत. गेल्या १६ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने सुरू असून, दरवर्षी सहभागी होणाऱ्या लष्करी तुकड्यांची संख्याही वाढत आहे. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, “सीमेवरील लष्करी ठाण्यांमध्ये गणेशमूर्तीची स्थापना केल्याने जवानांना सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक बळ मिळते. मराठा बटालियनचे जवान दरवर्षी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात. त्यामुळे देशाच्या विविध भागांत दगडूशेठ गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तींची स्थापना केली जाते.”देशाच्या विविध राज्यांतील जवान सीमावर्ती भागात कार्यरत आहेत. त्यांच्या गणेशोत्सवात बाप्पाचा आशीर्वाद आणि पुण्यातील भक्तीचा अनुभव पोहोचावा, या भावनेतून हा उपक्रम राबविला जात असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. (Dagdusheth Halwai Ganpati)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >