Bad Breath Remedies :तोंडाची दुर्गंधी कायमची पळवून लावा! करा हे अत्यंत सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय



















तोंडाची दुर्गंधी (Bad Breath/Halitosis) ही आजच्या काळात अत्यंत सामान्य पण तितकीच लाजीरवाणी वाटणारी समस्या बनली आहे. अनेकदा लोकांमध्ये वावरताना किंवा संवाद साधताना या दुर्गंधीमुळे आत्मविश्वास कमी होतो आणि संकोच वाटू लागतो. रोज सकाळी दात घासूनही काही वेळाने तोंडातून दुर्गंधी येणे, ही केवळ अस्वच्छतेचीच नाही तर शरीरातील इतर काही आरोग्याच्या तक्रारींचीही पूर्वसूचना असू शकते. तोंडातील बॅक्टेरिया, दातांमध्ये अडकलेले अन्नकण, कोरडे तोंड आणि जिभेवर साचलेला पांढरा थर ही यामागची मुख्य कारणे असतात. या समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर त्याचा आपल्या सामाजिक आयुष्यावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यावर उपाय म्हणून पुढील काही सोपे करा.





लवंग आणि दालचिनीचा उपाय


लवंग आणि दालचिनीमध्ये जिवाणूविरोधी गुणधर्म असलेले घटक आढळतात. त्यामुळे या दोन्हींचा वापर करून तयार केलेल्या पाण्याने गुळण्या करण्याचा उपाय केला जातो.



 दिवसातून दोनदा करू शकता


सकाळी दात घासल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी गुळण्या करण्याचा पर्याय आहे. मात्र, दुर्गंधी सतत राहत असल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता दंतचिकित्सकांचा सल्ला घ्या.

 जीभ स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे

 


तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी दररोज जीभ व्यवस्थित स्वच्छ करा. जिभेवर साचलेला थरही दुर्गंधीचे एक कारण ठरू शकतो.

भरपूर पाणी प्या


तोंड कोरडे पडल्यानेही श्वासाची दुर्गंधी वाढू शकते. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय लावा.

 फ्लॉसचा वापर करा


दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण काढण्यासाठी नियमित फ्लॉसिंग करणेही उपयुक्त ठरू शकते.

दुर्गंधी वारंवार जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला


च्युइंग गम, माउथ फ्रेशनर किंवा माउथवॉशने तात्पुरता दिलासा मिळू शकतो. मात्र, दुर्गंधी वारंवार किंवा दीर्घकाळ जाणवत असल्यास त्यामागील कारण जाणून घेण्यासाठी दंतचिकित्सकांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.









Comments
Add Comment

Kolkata Stampede: अरुंद प्रवेशद्वार, अंधार अन् अफवा; दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरीचं कारण काय?

कोलकाता येथील चोरबागान दुर्गा पूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, आयोजकांच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध