AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद नगर परिसरात मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. पावसाळ्यात वारंवार साठणाऱ्या या पाण्याचा अखेर शोध लागला असला असून यासाठी आता मोगरा नाल्याला आता अतिरिक्त वळण दिले जाणार आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यात या ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्याची समस्या कायमचीर दूर झालेली दिसणार आहे.


अंधेरी पश्चिम येथील मोगरा नाल्याचे भरडावाडी रोड कल्व्हर्टपासून ते जे.पी. रोड लगत डि.एन. नगर मेट्रो स्थानकाजवळील क्रिस्टल मॉल येथील मोगरा नाला कल्व्हर्टपर्यंत नविन पर्जन्य जलवाहिन्या पेटीका वाहिनीचे बांधकाम हे यापूर्वीच कंत्राटदारामार्फत करण्यात आले आहे. त्यामुळे, पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा जलद रितीने होऊन अंधेरी (पश्चिम) भागातील पाणलोट क्षेत्र क्र.२१८ मधून येणारे पावसाचे पाणी अंधेरी सब-वे मार्गे भोगरा नात्यामधून वाहून पुढे मिल्लत नगर, लोखंडवाला कॉम्प्लेक्स जवळ मालाड खाडीमध्ये विसर्जित होते. परंतु भरडावाडी कल्व्हर्स्टपासून जेपी रोडच्या बाजूने लिंक रोड कल्व्हर्ट (क्रिस्टल पॉइंट मॉलसमोर) पर्यंत मोरी पेटिका प्रकारची पर्जन्य जलवाहिनी बांधणे अत्यंत आवश्यक होते. ज्यामुळे पर्जन्य जलवाहिनीच्या नेटवर्कमुळे वीरा देसाई रोड, जेपी रोड आणि आझाद नगर जंक्शन, अंधेरी (प) येथील पूरग्रस्त ठिकाणे दूर होण्यास मदत होणार होती.



अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या कामात सुरुवातीला जे.पी रोडने भरडावाडी कल्व्हर्स्टपासून डीएन नगर मेट्रो स्टेशन ते मोगरा नाल्याच्या लिंक रोड कल्व्हर्ट (क्रिस्टल पॉइंट मॉलसमोर) पर्यंत १०५० मीटर लांबीचा मोगरा नाल्याचा ३.० मीटर बाय २.५ मीटर मोरी पेटिका (बॉक्स ड्रेन) बांधण्याचा प्रस्ताव होता. हे काम करताना, आझाद नगर मेट्रो स्टेशनच्या खाली खांब क्रमांक ८३ ते ८५ दरम्यान खांबाचा पायाच्या वाढीव आकार, महानगर गॅस लाईन, तसेच पाण्याची पाईप लाईन इत्यादीमुळे सुमारे ६० मी. लांबीपर्यंत प्रस्तावित ३.००बाय २.५ मी. मोरी पेटिकाचा आकार सुमारे १.० बाय २.५ मी. पर्यंत मर्यादित झाला आहे.


सल्लागाराने परिस्थितीचा अभ्यास करून प्रस्तावित नाल्याची आवश्यक राखण्यासाठी अतिरिक्त २.० बाय २.५ मी. आकाराची मोरी पेटिका बांधण्याचे काम हाती. स्पोटर्स कॉम्प्लेक्सपर्यंत सुमारे १५० मीटर लांबीचा २.०० मीटर बाय २.५ मीटर आकार सुचविले. त्यानुसार गिल्बर्ट हिल रोड जंक्शनपासून जे पी रोडच्या उत्तरेकडील बाजूने या पेटिकामध्ये सोडण्याकरीता हे काम केले जाणार आहे. या अतिरिक्त मोरी पेटिका जलमार्ग बांधून तो आधीच बांधलेल्या २.५ बाय ३.० मीटर आकाराच्या पेटीका नाल्याला जोडले जाणार आहे. या कामांसाठी ए-स्क्वेअर रिअॅल्टी या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कामांसाठी २ कोटी ६७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु