Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एक सदस्यीय आयोगाचा अहवाल राज्य शासनाला प्राप्त झाला आहे. या अहवालातील शिफारसी व निष्कर्षांच्या अनुषंगाने शासनाकडून करावयाच्या कार्यवाहीचा अहवाल तयार करण्यासाठी गृह विभागाच्या वतीने अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय उच्चस्तरीय छाननी समितीची स्थापना करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला. (Dr Sampada Munde Case)



फलटण (जिल्हा सातारा) येथील मधुदीप हॉटेलमध्ये २३ ऑक्टोबर २०२५ रोजी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली होती. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी शासनाने २ डिसेंबर २०२५ रोजीच्या अधिसूचनेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संजय मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी आयोग गठित केला होता. (Dr Sampada Munde Case)


आयोगाला सुरुवातीला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती, नंतर ती वाढवून ३१ मे २०२६ पर्यंत करण्यात आली. ठरवून दिलेल्या मुदतीत आयोगाने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आपला अंतिम अहवाल २९ मे २०२६ रोजी राज्य शासनाला सादर केला होता. न्यायमूर्ती संजय मेहरे आयोगाने सुचवलेल्या उपाययोजना आणि निष्कर्षांची छाननी करून मंत्रिमंडळ व विधिमंडळासमोर सादर करावयाचा 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' तयार करण्यासाठी ही ८ सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. (Dr Sampada Munde Case)



गृह विभागाचे अपर मुख्य सचिव छाननी समितीचे अध्यक्ष असतील. तर, प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग, प्रधान सचिव (सार्वजनिक आरोग्य विभाग), सचिव (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये), अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), पोलीस अधीक्षक (सातारा) आणि सह/उप सचिव (विधि), गृह विभाग आदी या समितीचे सदस्य असतील. ही समिती न्यायमूर्ती मेहरे आयोगाच्या अहवालातील शिफारसींची छाननी करून शासनाने घ्यावयाच्या पुढाकाराबाबतचा मसुदा तयार करेल. हा अहवाल मंत्रिमंडळ आणि विधिमंडळासमोर सादर केला जाणार असून, समितीला आपला अहवाल स्थापनेच्या दिनांकापासून ३ महिन्यांच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Dr Sampada Munde Case)

Comments
Add Comment

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची

Dussehra 2026 : यंदा विजयादशमी २० की २१ ऑक्टोबरला ? जाणून घ्या रावण दहनाची योग्य वेळ आणि पूजेचे मुहूर्त!

भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत पवित्र, आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे 'दसरा' किंवा

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे