Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड जिल्ह्यात भीषण अपघात झाला. किनवट तालुक्यातील तोटंबा जंगल घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कमांडर जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. या दुर्घटनेत 3 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ( Sahastrakund Waterfall)


मृतांमध्ये तुम सायलू (60), तुम गौरा बाई (60) आणि आवला गंगाधर (55) यांचा समावेश आहे. हे तिघेही तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील कुबेर मंडळातील पार्डी गावचे रहिवासी होते.



मिळालेल्या माहितीनुसार, पार्डी गावातील 10 ते 12 भाविक कमांडर जीपने नांदेडच्या किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आले होते. धबधब्याचा आनंद घेतल्यानंतर त्यांनी श्री महादेव मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर सर्वजण सायंकाळी आपल्या गावाकडे परतण्यासाठी निघाले.


तोटंबा गावाजवळील जंगल घाटातून जीप जात असताना चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की जीपचे मोठे नुकसान झाले आणि काही प्रवासी वाहनात अडकले. (Maharashtra News)


अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी जखमी प्रवाशांना जीपमधून बाहेर काढून मदत केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले.


अपघातातील 7 जखमींना तातडीने तेलंगणातील कुबेर मंडळ येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. या घटनेमुळे पार्डी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ( Road Accident)


Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि