Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष


मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा बुधवारी निकाल लागणार आहे. या बहुचर्चित प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणात उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे प्रतिवादी असल्याने संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.


दिशाचे वडील सतिश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत आपली मुलगी दिशा हिने आत्महत्या केलेली नसून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास केला नसून राजकीय दबावापोटी पुरावे लपवल्याचा दावाही त्यांनी याचिकेत केला आहे. याउलट, राज्य सरकारने आपली बाजू मांडताना मुंबई पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार हा आत्महत्येचाच प्रकार असल्याचे स्पष्ट केले आहे.



दुसरीकडे, या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केलेल्या आदित्य ठाकरे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी युक्तिवाद करताना, आपल्याला राजकीय वैमनस्यातून आणि सुडाच्या राजकारणातून या प्रकरणात गोवण्यात आल्याचे म्हटले आहे. याचिकाकर्त्यांच्या दुःखाबद्दल आणि दिशाच्या वडिलांबद्दल पूर्ण संवेदना असल्याचे सांगत, या दुर्दैवी मृत्यूवरून सुरू असलेले राजकारण आता थांबायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.


सुनावणीदरम्यान न्यायालयाने मृतदेहाच्या पंचनाम्यावरून आणि वैद्यकीय अहवालावरून काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केले होते, ज्यावर सरकारी वकिलांनी बाजू मांडली आहे. या प्रकरणातील अंतिम निकाल काय लागणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता