Bhiwandi News : शोध घेतला, तक्रारही केली... अन् अखेर लिफ्टच्या डकमध्ये सापडला महिलेचा मृतदेह; नक्की काय घडलं?
September 2, 2026 10:39 AM
ठाणे : भिवंडीत बेपत्ता झालेल्या 54 वर्षीय महिलेचा मृतदेह एका इमारतीच्या लिफ्टच्या डक्टमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी शोध घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. शाहीन मोहम्मद सुलतान शेख असे मृत महिलेचे नाव आहे. (Bhiwandi)
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ड्रग इन्स्पेक्टर (ग्रुप-B) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एका उमेदवाराला अटक केली आहे. ...
शाहीन शेख सोमवारी सायंकाळी रोशन बाग परिसरातील राबिया अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे गेल्या होत्या. रात्री साडेनऊच्या सुमारास त्या घरी जाण्यासाठी बहिणीच्या घरातून निघाल्या. मात्र, त्या घरी पोहोचल्या नाहीत. कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी भोईवाडा पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. ( Bhoiwada Police)
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. मोबाईलचे शेवटचे लोकेशन राबिया अपार्टमेंट परिसरातच असल्याचे समोर आले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक जाधव आणि त्यांच्या पथकाने परिसरात शोधमोहीम सुरू केली.
शोधादरम्यान शाहीन शेख यांचा मृतदेह इमारतीच्या लिफ्टच्या डक्टमध्ये आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, त्या चौथ्या मजल्यावरून लिफ्टने खाली जाण्याचा प्रयत्न करत असताना लिफ्टचा दरवाजा उघडला. मात्र, लिफ्ट त्या मजल्यावर नसून वरच्या मजल्यावर होती. लिफ्ट समजून त्यांनी डक्टमध्ये प्रवेश केल्याने त्या खाली पडल्या आणि गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, भोईवाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.
लिफ्ट वरच्या मजल्यावर असताना संबंधित मजल्यावरील लिफ्टचा दरवाजा कसा उघडला, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेमुळे इमारतींमधील लिफ्टच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ( lift accident)